Tarun Bharat

लाल-पिवळा हटवा अन्यथा भगवा फडकवू

Advertisements

युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

लाल-पिवळा अनधिकृत ध्वज शहरामध्ये काही ठिकाणी उभा करण्यात येत आहे. पोलीस संरक्षणातच हे काम सुरू आहे. महापालिकेसमोरही हा अनधिकृत ध्वज उभा करण्यात आला आहे. तो तातडीने हटवावा, अन्यथा 1 जानेवारी रोजी आम्हीही तेथे भगवा ध्वज लावू, असा खरमरीत इशारा युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मुठभर कन्नड कार्यकर्ते संपूर्ण बेळगावला वेठीस धरत आहेत. मात्र पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, असे म्हणत पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच कार्यकर्त्यांनी ठाण मांडले. प्रारंभी पोलीस आयुक्तांना भेटण्यास नकार देण्यात आला. काही पोलीस अधिकाऱयांनी समजूत काढुन आमच्याकडे निवेदन द्या, आम्ही ते देवू असे म्हणून कार्यकर्त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला.

मात्र कार्यकर्त्यांनी आम्हाला आमचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे की नाही? असा प्रश्न विचारला. त्यामुळे अखेर पोलीस आयुक्तांना भेटण्यास मुभा देण्यात आली. त्यावेळी लाल-पिवळय़ा रंगाचा तो ध्वज 31 डिसेंबरपूर्वी हटवावा, अन्यथा 1 जानेवारी 2021 रोजी महापालिकेवर भगवा ध्वज फडकवू, असा सणसणीत इशारा देण्यात आला आहे.

लाल-पिवळय़ा रंगाच्या या ध्वजाला कोणतीही अधिकृत मान्यता नसताना राष्ट्रध्वजाच्या समोरच हा ध्वज उभा करण्याचा प्रकार सुरू आहे. हा तिरंगा ध्वजाचा अवमान होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

यावेळी युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, मदन बामणे, आर. आय. पाटील, सुरज कणबरकर, सागर पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

डिसेंबर दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरू?

Patil_p

कांदा मार्केटमध्ये पुन्हा वादाचा प्रसंग

Patil_p

वर्दी रिक्षाचालकांवर भाजी विक्रीची वेळ

Patil_p

मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिकांचा स्नेहमेळावा

Amit Kulkarni

विद्युतखांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

दुसऱया दिवशीही लालपरी ठप्प

Patil_p
error: Content is protected !!