Tarun Bharat

लाल-पिवळा हटविण्यासाठी पुन्हा मागितला वेळ

पोलिसांनी अडविला मोर्चा, कार्यकर्त्यांनी ठाण मांडून केला निषेध

प्रतिनिधी / बेळगाव

लाल-पिवळय़ा रंगाचा अनधिकृत ध्वज महापालिकेसमोर उभा करण्यात आला आहे. त्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यास प्रारंभ केला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा सरदार्स मैदानाजवळ अडवून दडपशाही केली. त्यामुळे तेथेच ठाण मांडून म. ए. समितीचे कार्यकर्ते बसून राहिले. यावेळी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी आणि निषेध नोंदविण्यात आला. मोर्चासमोर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि मनपा आयुक्त जगदीश के. व्ही. हे आले. त्यांनी पुन्हा मार्च अखेरपर्यंतचा वेळ मागितला.

धर्मवीर संभाजी चौकापासून मोर्चाला सुरूवात झाली. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन आरती करण्यात आली. त्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचीही संख्या लक्षणीय होती. जसाजसा मोर्चा पुढे येत होता तसे मोर्चाचे स्वरुप वाढत चालले होते. त्यामुळे सरदार्स मैदानाजवळच मोर्चा पोलिसांनी अडविला. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती.

जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी

यावेळी पोलिसांच्या विरोधात व जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी देण्यात आली. हातात भगवा घेवून कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील झाले होते.

म. ए. समितीच्या नेत्यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला. मात्र तुम्हाला परवानगी दिली नाही त्यामुळे हा मोर्चा अडविलो, असे सांगितले. एकूणच मराठी भाषिकांवर पुन्हा एकदा दडपशाही करण्यात आली.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे मोर्चासमोर आले. त्यांनी कन्नडमधून बोलण्यास प्रारंभ केला. मात्र त्याला तीव्र विरोध करुन हिंदीतून बोलावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे हिंदीतून बोलून मार्च अखेरपर्यंतची मुदत मागितली आहे. या मोर्चामध्ये तरुणवर्ग मोठय़ा संख्येने होता. जोपर्यंत तेथील लाल-पिवळा हटवत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असे त्यांनी सांगितले. म. ए. समितीच्या नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तीव्र विरोध करण्यात आला. या मोर्चामध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे, मनोज पावशे, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, मधुश्री पुजारी, सुधा भातकांडे, तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मदन बामणे, ऍड. महेश बिर्जे, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. दीपक काकतकर, दिगंबर पवार, कल्लाप्पा पाटील, विश्वनाथ पाटील, रमाकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर, महादेव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी, बंडू केरवाडकर, दिलीप बैलुरकर, किरण बडवाण्णाचे, शुभम शेळके, सचिन किवळेकर, गुंडू कदम, अमोल केसरकर, सुनील बोकडे, राजू वर्पे, रामा शिंदोळकर, गोपाळ पाटील, आर. आय. पाटील, मधुश्री पुजारी, आप्पासाहेब पुजारी, मनोहर हलगेकर, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, अनुसया परीट, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, राकेश परीट, वनिता परीट,  शालन पाटील, रुपा पुण्याण्णावर, सुवर्णा बिजगरकर, परशराम परीट, माजी ग्रा.पं. उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, राजू पावले, महेश जुवेकर, संतोष मंडलीक, दत्ता उघाडे, सुहास किल्लेकर, अजित कोकणे, राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, सचिन गोरले, हणमंत मजुकर, सुनील जाधव, सुरज कणबरकर, रविंद्र जाधव, मेघन लंगरकांडे, नितीन जाधव, सुधीर कालकुंदीकर, विनायक बावडेकर, माजी ग्रा.पं. सदस्य मुकुंद घाडी यांच्यासह हजारोंच्या संख्येने म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

एप्रिलपासून स्टार एअरची विमानसेवा विस्तारणार

Patil_p

खराब सोयाबिन बियाणे उगवली नसल्याने नुकसान भरपाई द्या

Patil_p

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सर्वोत्कृष्ट ‘जिल्हा रिटर्निंग ऑफिसर’ पुरस्कार

Sandeep Gawade

बसथांब्याचे पार्किंग लॉटमध्ये रूपांतर…

Rohit Salunke

निपाणी येथील बाजारात मिरची कडाडली

Omkar B

सार्वजनिक गणेशोत्सवाला तहसीलदारांनी परवानगी द्यावी

Omkar B