मुंबई : मोबाईलच्या क्षेत्रातील कंपनी लावा इंटरनॅशनल लवकरच आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारात सादर करणार असल्याचे समजते. याकरीता कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे रीतसर अर्ज सादर केला आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 500 कोटी रुपये उभारणार असून 4 कोटी 37 लाख 27 हजार 603 समभाग ऑफर फॉर सेलसाठी असणार आहेत. कंपनीचे समभाग बीएसई व एनएसईवर लिस्ट होणार आहेत. भारतीय बाजारात लावा इंटरनॅशनलचा वाटा 13 टक्के इतका आहे.


previous post
next post