Tarun Bharat

‘लावा-डेल’सह 14 कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर

पीएलआय योजनेंतर्गत निर्मितीला मिळणार चालना – हजारोंना मिळणार रोजगार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने आयटी हार्डवेअर क्षेत्रात निर्मितीला बळ देण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत 14 कंपन्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये डेल, लावा, डिक्सन, विस्ट्रॉन आणि फोक्सकॉन यासारख्या देश-विदेशातील कंपन्यांचा समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार सदरच्या योजनेत चार वर्षात (आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2024-25) उत्पादन करण्यात येणार आहे.

या योजनेतंर्गत कंपन्यांकडून आगामी चार वर्षात 1.61 लाख कोटी रुपयाचे उत्पादन करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. यातून जवळपास 36 हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्ती होणार असल्याचेही सांगितले आहे. आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना 3 मार्च 2021 रोजी नोटिफाइड केली होती.

लॅपटॉप-टॅब्लेटचे उत्पादन

पीएलआय योजनेच्या माध्यमातून आयटी हार्डवेअरचे उत्पादन करण्यात येणार आहे. यामध्ये लॅपटॉप, टॅब्लेट, पर्सनल कॉम्प्युटर आणि सर्व्हरचा समावेश आहे. सदरच्या कार्यक्रमाचा उद्देश देशांतर्गत निर्मितीला चालना देणं आणि यासाठी मोठी गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करणे हा असणार आहे. आत्मनिर्भर भारत या मोहिमेंतर्गत देशांतर्गत उत्पादन वाढीस  अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. 

देशातील या कंपन्यांना मंजुरी

या 10 कंपन्यांमध्ये लावा इंटरनॅशनल लिमिटेड, डिक्सन टेक्नॉलॉजी, इंडिया लिमिटेड, इंफोपॉवर टेक्नॉलॉजीज, भगवती (मायक्रोमॅक्स), नियोलिंग, ऑप्टिमस, नेटवेब, स्माईल इलेक्ट्रॉनिक्स, व्हीव्हीडीएन आणि पनाके डिजिलाईफचा समावेश आहे.

Related Stories

असम-अरुणाचल सीमा वादावर तोडगा

Amit Kulkarni

युद्धनौका ‘दुनागिरी’ राष्ट्राला समर्पित

Patil_p

एन.व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश

datta jadhav

विमान तिकीटदर होणार स्वस्त

Patil_p

महाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’

Patil_p

भूमिपूजनासाठी सजली अयोध्यानगरी

Patil_p
error: Content is protected !!