Tarun Bharat

लाहिरीला पदक जिंकण्यासाठी चमत्काराची प्रतीक्षा

भारतीय गोल्फपटू अनिरबन लाहिरीने तिसऱया फेरीत लेट ईगलमुळे थोडीफार आगेकूच केली असली तरी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी चमत्कारावरच अधिक अवलंबून रहावे लागणार आहे. तिसऱया फेरीअखेर लाहिरीने 207 गुणांची कमाई केली. भारताचा आणखी एक गोल्फपटू 215 गुणांसह 55 व्या स्थानी फेकला गेला.

या गटात दुसऱया फेरीअखेर अमेरिकेचा शॉफेले आघाडीवर असून यजमान जपान देखील मास्टर्स चॅम्पियन हिडेकी मॅत्सुयामा (67) याच्या फॉर्ममुळे पदकाच्या शर्यतीत आहे. ‘36 होल्समध्ये माझी कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. आता पोडियमवर पोहोचण्यासाठी चमत्कारावरच अवलंबून रहावे लागेल’, असे लाहिरीने येथे नमूद केले.

Related Stories

रणजी सामन्यात कुशाग्रचे द्विशतक

Patil_p

तेजतर्रार गोलंदाजांमध्ये रंगणार आजचा मुकाबला

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये सिंहराज अधानाला कांस्यपदक

datta jadhav

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन तंदुरूस्त

Patil_p

शेष भारत संघाची वाटचाल जेतेपदाकडे

Patil_p

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

datta jadhav