Tarun Bharat

लिंब येथील कुसुम पेट्रोलपंपावर अनागोंदी कारभार

प्रतिनिधी / सातारा :

जिह्यात दिवसेंदिवस  कोरोना बाधितांच्या संख्येत कमलाची वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन कोरोना व्हायरसला आटोक्यात ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र दुस्रया बाजूला लिंब (ता.सातारा) येथील कुसुम पेट्रोलपंप चालक प्रशासनाच्या नियमावलीला तिलाजंली वाहीली जात आहे. सरसकट सर्व दोनचाकी वाहनधारकांना पेट्रोल दिले जात असून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे सदर पेट्रोल पंपावरील अनागोंदी कारभाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.    

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या   आदेशानुसार सातारा तालुका प्रांतधिकारी मिनाज मुल्ला यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर गर्दी होऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकांना निर्बंध घातले आहेत. यामध्ये  अत्यावश्यक सेवा देणारे  अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मलन कार्य करणाया खासगी व्यक्ती, वैद्यकिय उपचार व त्यांना साहय्य करणाया व्यक्ती यांना वगळून पेट्रोल व डिझेल देण्यावर बंधन घातले आहे. तसेच प्रशासनाची नियमावली मोडणाया पंप चालकावर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, लिंब हद्दीतील पेट्रोलपंप चालकाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीला हरताळ फासला आहे. पंपावर हलचाल रिजिस्टर ठेवण्यात आले नसून प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. सर्वच दोनचाकी वाहनधारकांना पेट्रोल-डिझेलची विक्री बॉटल, कॅनमधून व वाहनातून केली जात असून सोशल डिस्टन्सला फज्जा उडाला  आहे. तसेच पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी होताना दिसत आहे. एका बाजूला संपूर्ण जिल्हा प्रशासन कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसते, तर दुस्रया बाजूला पेट्रोलपंप  चालक प्रशासनाच्या नियम नियमावलीला  हरताळ करताना दिसत आहे. त्यामुळे लिंब येथील कुसुम पेट्रोलपंप चालकाला कोणाचे अभय आहे, याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत जिल्हा प्रशासन सदर पंपचालकावर काय भूमिका घेणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. चौकट : पेट्रोलपंपावर पोलीसांचा बंदोबस्त नाही.. जिह्यातील कोरोनाबाधिताची संख्या 43 येवून पोहचला आहे. मात्र या वाढत्या आकडय़ांची वाहनधारकांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. कुसूम पेट्रोलपंपावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नसल्याने वाहनधारकाची मोठय़ा प्रमाणात प्रगर्दी होत असल्याचे दिसत आहे. फोटो ओळ लिंब: कुसूम पेट्रोलपंपावर सर्व वाहनधारकांना कसलीही चौकशी न करता पेट्रोल व डिझेलची विक्री केली जात आहे.

Related Stories

सातारा : कोळघर मार्गे मेढा जाणारा रस्ता उखडला

Archana Banage

मॅप्रो गार्डनजवळील अपघात एक ठार ; एक जखमी

Patil_p

गडगडाट सुरु…कडकडाट थांबला…

Patil_p

‘प्रेमग्रंथ’ अल्बम अप्रतिम : खा. उदयनराजे भोसले

datta jadhav

अंगणवाडी सेविकांनी थेट पंतप्रधान मोदींकडेच केली वेतनाची मागणी

datta jadhav

राष्ट्रीय स्पर्धेत सुदेष्णा कांस्य पदकांची मानकरी

Patil_p