Tarun Bharat

लिबियात सात भारतीयांचे अपहरण

ऑनलाईन टीम / त्रिपोली : 

लिबियातील अशवरीफ येथून सात भारतीयांचे अपहरण झाले आहे. हे सातही जण मायदेशी परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकडे जात होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. 

अपहरण झालेले सात जण एका कन्स्ट्रक्शन आणि ऑईल कंपनीत काम करत होते. ते मूळचे आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. ट्युनिशियातील भारतीय दुतावास या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. तसेच अपहरण झालेल्या सर्व लोकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून, अपहरण झालेल्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

दरम्यान, लिबियातील वातावरण परदेशी नागरिकांसाठी चांगले नसल्याने भारत सरकारने 2016 मध्ये लिबियात जाण्यासाठी पूर्णपणे निर्बंध घातले होते. ते निर्बंध आजही कायम आहेत. 

Related Stories

काँग्रेस २०२३ च्या निवडणुकीपूर्वी उमेदवारांची घोषणा करणार

Archana Banage

केवळ पावसाचे पाणी पिणारा पक्षी

Patil_p

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आ. नितेश राणे फोडणार

Anuja Kudatarkar

हा तर निसर्गाचा चमत्कार

Patil_p

अमेरिकेत विक्रमी प्री-पोल मतदान

Patil_p

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडीने पुढे नेला : बाळासाहेब थोरात

Abhijeet Khandekar