Tarun Bharat

लिव्हरकुसेनच्या विजयात हॅवर्ट्झचे दोन गोल

Advertisements

बुंदेस्लिगा फुटबॉल : वेर्डर ब्रेमेनवर 4-1 गोल्सनी मात

वृत्तसंस्था/ ब्रेमेन, जर्मनी

के.हॅवर्ट्झने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर बायर लिव्हरकुसेनने वेर्डर ब्रेमेनवर 4-1 असा मोठा विजय मिळवित बुंदेस्लिगा स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवट केला. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे ही स्पर्धा सुमारे दोन महिने स्थगित करण्यात आली होती. या विजयामुळे लिव्हरकुसेनने पहिल्या चारमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली असून ते फक्त एका गुणाने दूर आहेत.

चौथ्या स्थानावर असणाऱया आरबी लीपझिग संघापेक्षा लिव्हरकुसेन या सामन्याआधी चार गुणांनी मागे होते. शनिवारी लीपझिग व फ्रीबर्ग यांचा सामना 1-1 असा अनिर्णीत राहिला होता. गेल्या शनिवारपासूनच बुंदेस्लिगा ही एकमेव प्रमुख लीग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हा सामनाही रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्यात आला. आक्रमक मिडफिल्डर हॅवर्ट्झ हा लिव्हरकुसेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हॅवर्ट्झने आपल्या खेळाने अनेक क्लब्सचे लक्ष वेधून घेतले असून त्याला मिळविण्यासाठी लिव्हरपूल, बार्सिलोना यासारखे बडे संघ प्रयत्नशील आहेत. या मोसमातील सर्व स्पर्धांत मिळून त्याने 12 गोल नोंदवले असून मागील मोसमात त्याने 20 गोल नोंदवले होते.

लिव्हरकुसेनचा हा 11 सामन्यातील 10 वा विजय होता. मात्र मार्च 12 रोजी युरोपा लीगमधील शेवटच्या सोळांमधील सामन्यात रेंजर्सवर 3-1 असा विजय मिळविल्यानंतरचा हा पहिलाच विजय आहे. प्रेक्षकाशिवाय खेळविल्या गेलेल्या या सामन्याची संथ सुरुवात झाल्यानंतर पाच मिनिटांत 3 गोल नोंदवल्यावर त्यात जान आली. 20 वर्षीय हॅवर्ट्झने 28 व्या मिनिटाला लिव्हरकुसेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी राईटबॅक थिओडर गेब्रे सेलासीने ब्रेमेनला बरोबरी साधून दिली. पण तीनच मिनिटानंतर हॅवर्ट्झने लिव्हरकुसेनला पुन्हा आघाडीवर नेले. हा गोलही त्याने केरेम डेमिर्बेच्या फ्री किकवर हेडरद्वारेच नोंदवला. पीटर बॉस्ज यांच्या लिव्हरकुसेन संघाने उत्तरार्धात आणखी दोन गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केला. मिचेल वीजर व डेमिर्बे यांनी हे गोल नोंदवले.

या सामन्यातील मोठय़ा पराभवामुळे ब्रेमेन पदावनतीकडे वाटचाल करीत असून ते पदावनती प्लेऑफपासून फक्त पाच गुण लांब आहेत तर सुरक्षित राहण्यासाठी त्यांना आणखी 9 गुण मिळविण्याची गरज आहे. मात्र त्यांचा फक्त एकच सामना बाकी आहे. 1963 मध्ये बुंदेस्लिगाची सुरुवात झाल्यापासून फक्त एकदाच 1980-81 च्या मोसमात ब्रेमेन अव्वल फेरीपासून दूर राहिले होते.

Related Stories

द. आफ्रिका दौऱयाची हमी दिलेली नाही : बीसीसीआय

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी दणदणीत विजय

Patil_p

भारत-लंका पहिला टी-20 सामना आज

Patil_p

न्यूझीलंड इलेव्हन संघात रॉस टेलरचा समावेश

Patil_p

बिग बॅश लीगमध्येही ‘डीआरएस’ची एन्ट्री

Amit Kulkarni

एकाच फुटबॉल संघातील 25 जणांना कोरोनाची लागण

datta jadhav
error: Content is protected !!