Tarun Bharat

लिव्हरपूलकडे प्रिमियर लीग फुटबॉल करंडक

लिव्हरपूल : लिव्हरपूल फुटबॉल क्लबने प्रिमियर लीग फुटबॉल करंडकावर आपले नाव कोरले. बुधवारी झालेल्या या स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात लिव्हरपूलने चेल्सीचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव केला. तब्बल 30 वर्षांनंतर लिव्हरपूलचे हे पहिले विजेतेपद आहे.

बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीच्या तुलनेत लिव्हरपूलचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान ठरला. प्रेक्षकांना प्रवेशबंदी असताना हा सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियमच्या बाहेर लिव्हरपूलच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. वारंवार फटाक्यांची आतषबाजी शौकिनांनी केली. जर्गेन क्लॉपच्या लिव्हरपूल संघाचा बुधवारचा दिवस संस्मरणीय ठरला. यापूर्वी लिव्हरपूलने पाचपैकी केवळ दोन सामन्यांत विजय मिळविला होता. या सामन्यात पूर्वार्धात लिव्हरपूलतर्फे नेबाय किटा, ट्रेंट अलेक्झांडर अरनॉल्ड आणि विजेनडम यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तरार्धात रॉबर्टो फिर्मिनो आणि ऍलेक्स चेंबरलिन यांनी प्रत्येकी एक गोल करून लिव्हरपूलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या विजयामुळे लिव्हरपूलचा संघ पुढीलवर्षी होणाऱया चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पात्रतेच्या उंबरठय़ावर आहे.  चेल्सी चौथ्या स्थानावर घसरले असून त्यांना चॅम्पियन्स लीगमधील स्थान निश्चित करण्यासाठी एका गुणाची गरज आहे. त्यांचा पुढील सामना रविवारी वुल्व्जविरुद्ध होणार आहे.

Related Stories

क्लिफोर्ड मिरांडा ओडिशा संघाचे सहाय्यक प्रशिक्षक

Patil_p

पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव

Patil_p

सुमीत नागलचा अव्वलमानांकित गॅरिनला धक्का

Amit Kulkarni

फिलिपीन्सला हरवून ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पहिल्या कसोटीत लंकेची स्थिती मजबूत

Patil_p

मुगुरुझा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p