Tarun Bharat

लिव्हरपूलचा विजयाचा दुष्काळ समाप्त

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत गेल्या पाच सामन्यामध्ये लिव्हरपूल संघाला विजय नेंदविता आला नव्हता. पण गुरूवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात लिव्हरपूलने टॉटेनहमचा पराभव करत विजयाचा दुष्काळ समाप्त केला. या सामन्यात लिव्हरपूलने टॉटेनहमचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या चार संघात स्थान मिळविले.

इंग्लिश चॅम्पियन्स लिव्हरपूल संघाला या स्पर्धेतील साखळी फेरीतील झालेल्या शेवटच्या चार सामन्यात एकही गोल नोंदविता आला नव्हता. गुरूवारच्या सामन्यात टॉटेनहम हॉटस्परचा फुटबॉलपटू हॅरी केनला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. लिव्हरपूलतर्फे पहिल्या सत्राअखेर भरपाई वेळेत रॉबर्टो फर्मिनोने चौथ्या मिनिटाला, ट्रेंट अलेक्झांडरने 47 व्या मिनिटाला तर सॅडिओ मेनने 65 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. टॉटेनहमचा एकमेव गोल पिएरेने 49 व्या मिनिटाला केला.

Related Stories

तुर्कीत फुटबॉलला जूनमध्ये प्रारंभ

Patil_p

जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत शिवा थापा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

एअर इंडियाच्या कर्मचाऱयाविरूद्ध कारवाईची मनू भाकरची मागणी

Patil_p

विंडीज-इंग्लंड यांच्यात आज दुसरी लढत

Patil_p

फुटबॉलपटू रॉय कृष्णाच्या करारात वाढ

Patil_p

टी-20 मानांकनात भारताचे दुसरे स्थान कायम, वनडेत न्यूझीलंड अग्रस्थानी

Patil_p
error: Content is protected !!