वृत्त संस्था/ लिव्हरपूल
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी लिव्हरपूल संघाने आपली विजयी सलामी दिली. ऍनफिल्ड येथे झालेल्या सामन्यात लिहरपूलने लीडस्चा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. लिव्हरपूलतर्फे मोहम्मद सलाने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.
या सामन्यात लीडस् संघाची कामगिरी दर्जेदार झाली. लीडस् संघातर्फे जॅक हॅरीसन, पॅट्रीक बेमफोर्ड आणि क्लिच यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. दरम्यान सामन्याच्या पूर्वार्धात मोहम्मद सलाने दोन गोल तर डिजेकने हेडरद्वारे लिव्हरपूलचा तिसरा गोल नोंदविला. सलाने सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना आपला वैयक्तिक तिसरा आणि संघाचा चौथा व निर्णायक गोल नोंदवून लीडस्चे आव्हान संपुष्टात आणले.