Tarun Bharat

लूकवरून जान्हवी ट्रोल

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरची फॅशन स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. नुकतीच जान्हवी मुंबईत एका ऍवॉर्ड शोमध्ये सहभागी झाली. या कार्यक्रमात तिच्या लूकची खूप चर्चा झाली, मात्र आता तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची फॅशन स्टाईल नेहमीच चर्चेत असते. तिने काहीही परिधान केले तरी ते ट्रेंडिंग व्हायला वेळ लागत नाही.

अलीकडेच जान्हवीने एका ऍवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली तिथे तिच्या हॉट लुकने सर्वांना वेड लावले होते. पण काही लोकांना तिचा लूक आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काहिंनी तर जान्हवीच्या प्लास्टिक सर्जरीचा अंदाज लावला आहे.

जान्हवीने ऍवॉर्ड फंक्शनमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाइलमुळे जान्हवीचा लूक अधिक हॉट झाला पण आता या लूकची तुलना किम कार्दशियनशी केली जात आहे.

Related Stories

प्रियांकाच्या ‘मॅट्रिक्स 4’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

‘चालबाज’साठी ऍक्शनचे प्रशिक्षण घेणार श्रद्धा

Patil_p

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा एक महिन्यातच ब्रेकअप

Patil_p

ओटीटीवर क्रिती सेनन करणार पदार्पपण

Amit Kulkarni

हॉलिवूडमध्ये झळकणार श्रुती हासन

Amit Kulkarni

जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा! २०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

Archana Banage