Tarun Bharat

लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक दाखल

तीन वर्षाची वॉरंटी, पॉवरबँक चार्जिंगसाठी चार फुटाची केबल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मार्टफोनच्या चार्जिंगकरिता अनेक कंपन्यांनी आपली पॉवरबँक बाजारात दाखल केल्याचे आपण याआधी पाहिले आहे पण आता लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक अस्तित्वात येत आहे. हो, हे खरंय. पिन पेरीफेरल्स लिमिटेडने लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक सादर केली आहे. इएनएलएपी पॉवर असे या पॉवरबँकचे नाव आहे. लॅपटॉप चार्ज करणारी ही देशातील पहिली वहिली पॉवरबँक असणार आहे. या पॉवरबँकमध्ये 20 हजार एमएएचची दमदार बॅटरी असणार आहे.

युएसबी सी-टाईपच्या लॅपटॉपला सहजपणे चार्ज करता येणाऱया या पॉवर बँकची किंमत 9 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. यावर तीन वर्षाची वॉरंटी कंपनीने दिली आहे. लॅपटॉप चार्ज करण्यासाठी चार फूट लांबीची केबल कंपनीतर्फे दिली जाणार आहे. एकाचवेळी तीन उपकरणे चार्ज करता येण्याची सोय या पॉवरबँकमध्ये असून अल्ट्रा ब्लॅक प्रीमियम बॉडीसह सदरची पॉवरबँक येईल. मॅकबुक, मॅकबुक एअर, मॅकबुक प्रो, एमएस सरफेस प्रो, डेल एक्सपीएस 13, एचपी स्पेक्ट्रर, एक्स 360, लिनोवो आयडिया पॅड, एलजी ग्राम आणि असुस झेन बुक 13 आदी यावर चार्ज करता येण्याची सोय असणार आहे. स्मार्टफोन्सही यावर चार्ज करता येतात.

Related Stories

जागतिक सकारात्मकतेत शेअरबाजार तेजीसह बंद

Patil_p

इलेक्ट्रिक वन-आयपॉवरची होणार 500 सेवा केंद्रे

Patil_p

पतंजली समूहाची उलाढाल 30 हजार कोटींवर

Patil_p

डिसेंबरमध्ये प्रवास, पर्यटन क्षेत्रातील रोजगार 4 टक्क्यांनी वाढला

Patil_p

भारत, जीसीसी एफटीए पुढे नेण्यासाठी सहमत

Patil_p

आतापर्यंत पाच कोटीपेक्षा अधिकचे आयटी रिटर्न सादर

Amit Kulkarni