Tarun Bharat

लेंडीनाल्याची अधिकाऱयांकडून पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील सांडपाण्यासाठी असलेला लेंडीनाला कचऱयाने बुजून गेला आहे. या नाल्यावर अतिक्रमण झाले तसेच हा नाला बुजल्यामुळे शेतकऱयांच्या जमिनीमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. यानंतर शेतकऱयांनी या नाल्याची खोदाई करावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन नाल्याच्या खोदाईला सुरुवात करण्यात आली आहे. काही प्रमाणात खोदाई झाली असून ती लवकरात लवकर पूर्ण करा, अशी सूचना महापालिका अधिकारी आणि आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.

शहरातून जाणारा लेंडीनाला हा राष्ट्रीय महामार्ग तसेच बळ्ळारी नाल्याला जाऊन पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांपासून या नाल्यामध्ये कचरा साचल्यामुळे हा नाला बुजून गेला होता. याचबरोबर या नाल्यावर काही जणांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे तीन-चार ठिकाणी नाला फुटला होता. ते भगदाड शेतकऱयांनी एपीएमसी सदस्य तानाजी पाटील यांच्या सहकार्यातून बुजविले होते.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, महादेव चौगुले, बाळेकुंद्री यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर यावर्षी आता या नाल्याच्या खोदाईला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी आमदार अनिल बेनके, महापालिकेचे अधिकारी अनिल माने, कुलकर्णी, प्रकाश पंढरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच ते काम पूर्ण करण्याबाबत सूचना केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत नारायण सावंत व इतर शेतकरी उपस्थित होते. 

Related Stories

मच्छेतील संभाजीनगर अडकलेय समस्यांच्या गर्तेत

Amit Kulkarni

मुग्धा वैशंपायन यांची रविवारी शास्त्रीय गायन मैफल

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द येथे कडकडीत बंद

Amit Kulkarni

नळाच्या चाव्या नादुरुस्त झाल्याने पाणी वाया

Amit Kulkarni

‘अन्नभाग्य’मध्ये प्लास्टिकसदृश तांदूळ

Amit Kulkarni

बागायतच्या अनुदानाने चिंच उत्पादनात वाढ

Amit Kulkarni