Tarun Bharat

लेक्चर बेसिस शिक्षकांची पगारवाढ करावी

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

ज्या शिक्षिका विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितात त्या सध्या अडचणीत आल्या आहेत. 2013पासून एकूण 220 शिक्षकांना 250 रूपये प्रति लेक्चरवर मिळत होते ते अजूनपर्यंत तसेच आहे. कुठलाही कामगार काम करण्याचे शुल्क वाढवितात. परंतु अजूनपर्यंत लेक्चर बेसिस शिक्षिकांचे रूपये वाढविण्यात आले नाहीत तसेच काही शिक्षिकांचा पगारही झाला नाही. त्यामुळे सरकारने 250 रूपयावरून 600 रूपये करावे तसेच सरकार जर शिक्षकांना लेक्चर बेसिसवर न करता कंत्राटी पद्धतीवर करण्याचा विचार करत असेल तर त्यांना 40 हजार प्रति महिना पगार करावा अशी मागणी अखिल गोवा उच्च माध्यमिक लेक्चर बेसिस शिक्षक संघटनेतर्फे पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

कोरोना काळात घरात राहून शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले. शिक्षकांना सन्मान मिळणे आवश्यक आहे. सरकारने शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. 250 रूपये प्रति लेक्चरला हे शिक्षकांना परवडत नसून यात वाढ होणे गरजेचे आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनाही भेटलो असून यावर मुख्यमंत्र्यांनी खोटे आश्वासन दिले आहे. सध्या प्राथमिक शिक्षकांना 34 हजार रूपये पगार देत असून उच्च माध्यमिक शिक्षकांना 25 हजार रूपये दिले जातात. सरकार शैक्षणिक दर्जाकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने ज्या शिक्षकांचा पगार झाला नाही त्यांचा पगार द्यावा अशी मागणी रामा काणकोणकर यांनी यावेळी केली.

Related Stories

रायबंदर पाटो पुलाचा भाग कोसळला

Amit Kulkarni

केपे सरकारी महाविद्यालयात मराठी टंकलेखन कार्यशाळा उत्साहात

Amit Kulkarni

बनावट नावाने फेसबुकचा वापर करणाऱयास अटक

Amit Kulkarni

कारापूर सर्वणच्या सरपंचांचा राजिनामा

Amit Kulkarni

बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Amit Kulkarni

मडगाव पालिकेकडून पूर्ववत थर्मल गनद्वारे तपासणी

Omkar B
error: Content is protected !!