Tarun Bharat

लेखी आश्वासनाशिवाय शेळ मेळावली आंदोलन मागे घेणार नाही

आंदोलनकर्त्यांचा निर्धार. गांजे येथे निषेध फेरी अडवल्यामुळे तणावाची परिस्थिती.

प्रतिनिधी /वाळपई

आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्यावेळी 40 जणावर दाखल केलेले फौजदारी स्वरूपाचे गुन्हे लेखी स्वरूपात मागे घेणे अत्यंत गरजेचे आहे. शाब्दकि आश्वासनावर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत लेखी आश्वासने देण्यात येत नाही तोपर्यंत शेळ मेळावली येथील ग्रामस्था?नी उभारलेले आंदोलन कदापि मागे घेणार नाही. गरज पडल्यास बेमुदत आंदोलन सुरू करणार अशाप्रकारे इशारा या विभागातील आंदोलक ग्रामस्था?नी दिला आहे .

दरम्यान आज सकाळी निषेध फेरीला सुरुवात करण्यात आल्यानंतर उसगाव याठिकाणी जात असतानाच गांजे या ठिकाणी सदर निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती .

परवानगी नसल्यामुळे ही फेरी काढता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. नंतर आंदोलक संतप्त बनले व सरकारचा निषेध करीत वाळपई मतदार संघाच्या इतर भागांमध्ये दिवसभर  निषेध फेरी काढण्यात आली. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन चालकानी मोठय़ा प्रमाणात भाग घेतला होता.

याबाबतची माहिती अशी की शेळ मेळावली येथे  सरकारतर्फे  उभारण्यात येणार असलेल्या आययटी प्रकल्पाच्या विरोधात सदर भागातील ग्रामस्था?नी मोठय़ा प्रमाणात आंदोलन केले होते. या आंदोलनाच्यावेळी सरकारने 40 जणांवर फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल केले होते .सदर खटले मागे घेण्यात यावे. त्याचप्रमाणे सरकारने आयआयटी प्रकल्पाच्या नावावर केलेली जमीन मागे घ्यावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या .या संदर्भात ठराव गुळेली पंचायत ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. मात्र सदर मागणी मान्य न झाल्यामुळे गेल्या आठवडय़ापासून गुळेली पंचायतीसमोर ग्रामस्था?नी आंदोलन सुरू केले आहे.

सोमवारी पुन्हा एकदा सदर आंदोलनाला सुरुवात झाली होती. यावेळी रात्रभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जोपर्यंत उपजिल्हाधिकारी गटविकास अधिकारी गुळेली याठिकाणी येत नाही तोपर्यंत पंचायतीचे कार्यालय बंद करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर सोमवारी संध्याकाळ सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी प्रवीण परब गटविकास अधिकारी सुर्याजीराव राणे सरदेसाई वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीश गावस व इतर अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत गुन्हे मागे घेऊन जमीन परत घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार असल्याचा इशारा देण्यात त्यानंतर सविस्तरपणे झालेल्या चर्चेत रात्री उशिरा सदर आंदोलन तूर्तास मागे घेतले होते .

मात्र मंगळवारी सरकारच्या निषेधार्थ वाळपई मतदारसंघांमध्ये निषेध फेरी काढून सरकारचा निषेध करण्यात येईल अशा प्रकारचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी या निषेध केलेला सुरुवात झाली..

  यानिषेध फेरीचे नियोजन प्रथम उसगाव भागातून करण्यात आले होते. या भागातून सदर निषेध फेरी उसगाव या ठिकाणी जाण्यासाठी निघाली असता गांजे या ठिकाणी ती अडविण्यात आली. कारण गांजे येथील  जलस्तोत्र खात्यातर्फे बांधण्यात आलेल्या पाणी साठा प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार होते. यावेळी सदर ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता वर्तवून सदर निषेध फेरी अडविण्यात आली. यावेळी सदर परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी उसगाव भागांमध्ये फेरी घेऊन जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. यासाठी परवानगीची गरज आहे. परवानगी नसल्यामुळे आपण सदर फेरी पुढे जाण्यासाठी परवानगी देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले व तेथून माघारी परतण्याचे आवाहन केले .

यावेळी उपस्थित असलेल्या आंदोलनाच्या नेत्यांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला. यावेळी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला .लोकशाहीमध्ये अशाप्रकारे निदर्शने करण्यासाठी सरकार बंदी घालत असल्यामुळे लोकशाहीची थट्टा असल्याचे स्पष्ट करून सरकार जनतेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करून सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर सदर निषेध फेरी गुळेली भागातून खोतोडा सावर्डे नगरगाव वाळपई आदी ठिकाणी फिरविण्यात आली .यामध्ये मोठय़ा प्रमाणात दुचाकी वाहन चालकांची उपस्थिती होती. काळे झेंडे लावून निषेध फेरी काढण्यात आली.

निषेध फेरी काढण्यापूर्वी  पत्रकाराशी बोलताना आंदोलनाचे नेते शशिकांत सावर्डेकर शुवम शिवलकर शंकर नाईक यांनी सरकारचा निषेध केला. सरकारावर आमचा अजिबात विश्वास नाही. सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला चार दिवसांची मुदत देण्यात येत आहे.चार दिवसांमध्ये सदर गुन्हे मागे घेऊन जमीन जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन अजिबात शमणार नसल्याचे स्पष्ट केले. चार दिवसांमध्ये या दोन्ही मागण्या मान्य करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील व आंदोलन पुन्हा एकद उग्र रूप धारण करील अशाप्रकारचा इशारा देण्यात आला आहे.

पंचायत कार्यालय बंद.

दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार आज आंदोनकर्त्यानी निषेध फेरी आयोजित करण्यात आल्यामुळे पंचायत कार्यालयात असण्याची शक्मयता असल्यामुळे  पंचायतीचे कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले होते.एकही कर्मचारी न आल्यामुळे पंचायतीचे कार्यालय सुरू होऊ शकले नाही.

Related Stories

विवाहित तरुणावर धर्मांतरासाठी दबाव

Amit Kulkarni

प्रतिदिन पाच तास पाणी देण्याचा प्रयत्न करणार

Amit Kulkarni

यंदा स्वरमंगेश संगीत व नृत्य महोत्सव होणार नाही

Patil_p

मेळावलीवासियांना सोडली जागा

Patil_p

रेल्वेमार्ग दुपदरीकरण विरोधी चळवळ वाढवणार

Patil_p

डॉ.रामाणी यांच्या कार्यातून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी

Amit Kulkarni