Tarun Bharat

लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

Advertisements

पहिल्यांदाच भाग घेतलेल्या आनंदची सलामी स्विडरलशी

वृत्तसंस्था/ चेन्नई

चेस 24 लेजेंड्स ऑफ चेस टूर्नामेंटमध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदची सलामीची लढत रशियाच्या पीटर स्विडलरशी होणार आहे. मॅग्नस कार्लसन चेस टूरमधील स्पर्धेत आनंद व स्विडलर यांनी पहिल्यांदाच भाग घेतला आहे.

ऑनलाईनवर मंगळवारपासून राऊंडरॉबिन सामन्यांना प्रारंभ होणार असून चार डावांची ही लढत असेल. आनंदच्या त्यापुढील लढती वर्ल्ड चॅम्पियन कार्लसन, क्रॅमनिक, अनिश गिरी, पीटर लेको, इयान नेपोमनियाची, बोरिस गेलफँड, डिंग लिरेन, व्हॅसेली इव्हान्चुक यांच्याशी होणार आहेत. लॉकडाऊनमुळे आनंद सुमारे तीन महिने जर्मनीत अडकून पडला होता. जर्मनीत असताना त्याने नेशन्स कप ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर तो प्रथमच ऍक्शनमध्ये दिसणार आहे. ही स्पर्धा 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

कार्लसन चेस टूरचा भाग असलेल्या चेसेबल मास्टर्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेल्या कार्लसन, लिरेन, नेपोमनियाची, गिरी यांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. 40 ते 52 या वयोगटातील सहा लेजेंड्सविरुद्ध त्यांच्या लढती होणार आहे.  या स्पर्धेतील विजेता अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून ग्रँड फायनल 9-20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी 3 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या टूरवर कार्लसनने दोन व रशियाच्या डॅनील डुबोव्हने एक स्पर्धा जिंकून फायनलसाठी पात्रता मिळविली आहे. लेजेंड्स स्पर्धेतून नवा चॅम्पियन मिळाल्यास अमेरिकेचा हिकारु नाकामुरा फायनलसाठी पात्र ठरणारा चौथा खेळाडू ठरेल. कारण टूरवरील एकही स्पर्धा न जिंकणाऱया खेळाडूंत तो सर्वाधिक गुण मिळवून आघाडीवर आहे. उपांत्य फेरीत चार रॅपिड (15 मिनिटे) डावाचे तीन सेट्स खेळविले जातील. यात बरोबरी झाल्यास 5 मिनिटांचे दोन ब्लिट्झ डाव खेळविले जातील. यातही बरोबरी झाल्यास आर्मागेडॉनचा अवलंब केला जाईल. यामध्ये पांढऱया मोहऱयांनी खेळणाऱयाला 5 मिनिटे असतील तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला 4 मिनिटे मिळतील. अनिर्णीत स्थिती यातही कायम राहिली तर काळय़ा मोहरांनी खेळणाऱयाला विजेता घोषित केले जाईल.

Related Stories

केन विल्यम्सनचे 24 वे कसोटी शतक

Patil_p

Women’s Kabaddi: इस्लामपूरचे कन्या महाविद्यालय विजेते

Archana Banage

मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य

Patil_p

भारताचे चार इक्वेस्ट्रियन रायडर्स पात्र

Patil_p

इंग्लंडला 296 धावांचे आव्हान

Patil_p

इंग्लिश कसोटी संघातून ब्रॉड-अँडरसनला डच्चू

Patil_p
error: Content is protected !!