Tarun Bharat

लेबननच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार पायउतार

ऑनलाईन टीम / बैरुत : 

लेबननची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या अमोनियम नायट्रेटच्या भीषण स्फोटानंतर आठवडाभरातच पंतप्रधान हसन दियाब यांच्यासह त्यांच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच हसन दियाब यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली.

दियाब म्हणाले, मागील आठवड्यात बैरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशातील नागरिकांमध्ये जणक्षोभ उसळला आहे. सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. सरकारने सत्तेवरून पायउतार होण्याची मागणी सातत्याने होत आहे. लोकांना बदल हवा आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही राजीनामा देत आहोत. राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे मी राजीनामा दिला आहे. माझ्या मंत्रीमंडळातील इतर नेत्यांनीही राजीनामा दिला आहे.

4 ऑगस्टला बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात 220 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 110 जण अद्याप बेपत्ता आहेत. तर 6000 हून अधिक जण बेपत्ता आहेत. 

Related Stories

काँग्रेसलाही धक्का? बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या तयारीत

Archana Banage

Video-चिमुकल्याने खा.अमोल कोल्हेंना जोडले दोन्ही हात

Abhijeet Khandekar

24 तासांत तयार होणार 3डी घर

Patil_p

देशात 2.80 कोटी रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

…तर आम्ही गप्प बसणार नाही, रक्तपात होईल, सर्वपक्षीय मोर्चात इशारा

Archana Banage

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना फोन; राजकीय चर्चांना उधाण !

Archana Banage