Tarun Bharat

लेहंगा चोलीचा असाही वापर

मैत्रिणींनो, लग्नातली लेहंगा चोली किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी घेतलेला महागडा पेहराव फारतर दोनचार वेळा घातला जातो. एवढय़ा महागडय़ा पेहरावाचं काय करायचं, अशा प्रश्नही उपस्थित होतो. लेहंगा चोलीचे पैसे वसूल करायचे असतील तर तुम्ही थोडंफार डोकं लढवायला हवं. लेहंगा चोलीचा वापर कशा पद्धतीने करता येईल याविषयी…

  • लेहंगा आणि चोली एकमेकांना जोडून ट्रेंडी इव्हिनिंग गाऊन तयार करता येईल. त्यावर लेहंगा चोलीचा दुपट्टा घेऊन मिरवता येईल. अगदी कमी पैशात नवं प्रावरण तयार होईल.
  • लेहंग्याचा हेवी दुपट्टा अनारकली, पटियाला, पलाझो सूटसोबत कॅरी करता येईल. तुमच्याकडे एखादा प्लेन सलवार कमीझ असेल  तर त्यावरही हा दुपट्टा घेता येईल. क्रॉप टॉप आणि शरारा पँट असा लूक करून त्यावर दुपट्टयाचा श्रगसारखा वापर करता येईल. 
  • एखाद्या प्लेन साडीवर लेहंग्याचा ब्लाउज घालता येईल. पारंपरिक लूकसाठी हा ब्लाउज स्कर्टवरही घालता येईल.
  • इंडोवेस्टर्न लूकसाठी लेहंग्यावर लाँग कुर्ता घालू शकता. क्रॉप टॉप आणि पँटवर दुपट्टा घेता येईल. सध्या पँट स्टाईल साडीची क्रेझ आहे. दुपट्टा साडीसारखा कॅरी करून वेगळा लूक मिळवू शकता.

Related Stories

‘या’ दोन प्रकारे केसांना लावा कढीपत्ता , केस होतील मजबूत आणि चमकदार

Archana Banage

महाराष्ट्र संस्कृतीला छेद देणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घाला

Rahul Gadkar

केसांवर चमक आणण्यासाठी घरच्या घरी करा हेअर स्पा

Kalyani Amanagi

दिवाळीत असा करा झटपट मेकअप

Kalyani Amanagi

आपली नखं करा घरच्या घरी आकर्षक

Omkar B

अशी निवडा ब्रायडल पर्स

Amit Kulkarni
error: Content is protected !!