Tarun Bharat

ले. कर्नल रणजित खाडे यांचा मुख्यमंत्री त्रिवेंदसिंह रावत यांच्या हस्ते सत्कार

Advertisements

प्रतिनिधी/सरवडे

कासारपुतळे ता. राधानगरी येथील लेफ्टनंट कर्नल रणजित सीताराम खाडे यांचा सत्कार मुख्यमंत्री त्रिवेंदसिंह रावत यांच्या हस्ते देहरादून येथे झाला. खाडे यांच्या सैनिक टीमने कोरोना काळात लोकांना क्वारंटाईन करणे, डॉक्टरांच्या मार्फत उपचार करणे आदी कामे केली होती. त्यांच्यासोबत ३६ कोरोना वारियर्स यांचाही सत्कार झाला.

रणजीत खाडे यांनी सैनिक टीमचे नेतृत्व केले होते. खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.आशिष कुमार श्रीवास्तव, नोडल अधिकारी सीडीओ नितिका खंडेलवाल, बीरसिह बुदियाल, शेखर सुयाल, मसूरी नरेंद्र पंत , डालनवाला विवेक कुमार, सदर अनुज कुमार ,ऋषिकेश भूपेंद्रसिंह धोनी ,प्रभारी निरीक्षक कोतवाली शिशुपाल सिंह नेगी, ठाणा अध्यक्ष सेलाकुई विपिन बहुगुणा ,ठाणा अध्यक्ष कालसी गिरीश नेगी, प्रभारी निरीक्षक हरर्बटपुर हिमानी चौधरी आणि प्रभारी चौकी धारा शिशुपाल राणा यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी लेफ्टनंट कर्नल रणजित खाडे, सुकांत मिहीर पाठक, सुभेदार दलपत सिंह चौहान ,हवालदार विनोद कुमार गुप्ता ,कंपनी हवालदार कृष्णा कुमार मित्रा ,हवालदार बी बी कुमार, लेफ्टनंट मालविका के, नायक संजय कुमार नायब, सुभेदार डिके सिंह , हवलदार प्रेमसिंह, हवालदार नरेश कुमार सी., चिकित्सा मध्ये डॉ. हिमानी भंडारी, आयुर्वेदिक चिकित्सालय साफिया नूर यांचा गौरव केला. कर्नल रणजित हे कासारपुतळेचे उपसरपंच सिताराम खाडे यांचे सुपुत्र आहेत.

Related Stories

कोल्हापूर विमानतळावर इंडियन कोस्ट गार्डकडून मान्सूनपूर्व तयारी

Abhijeet Shinde

जि.प.च्या ‘समाजकल्याण’ साठी 100 टक्के निधी द्या

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव एस.टी.कॉलनीत आणखी तीन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

उचगाव चौक, तावडे हॉटेल जवळ वाहतूक कोंडी कायम

Abhijeet Shinde

कोनवडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुभाष पाटील यांची निवड

Abhijeet Shinde

देशाची वाटचाल पुरोगामी विचाराने व्हावी-श्रीमंत शाहू छत्रपती यांचे प्रतिपादन

Archana Banage
error: Content is protected !!