Tarun Bharat

लॉकडाउनमध्ये 39 पत्नींना सांभाळण्याचे दिव्य

दिवसाला 100 किलो तांदळासह 49 किलो चिकनची गरज

मिझोरम येथे राहणाऱया जिओना चाना यांच्या कुटुंबाला जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून ओळखले जाते. या कुटुंबात एकूण 181 लोक राहतात, कुटुंबाचा प्रमुख चाना असून त्याला 39 पत्नी आहेत. या पत्नींपासून त्याला एकूण 94 अपत्य आहेत.

चाना स्वतःच्या या कुटुंबासमवेत मिझोरमच्या बटवंग गावात 100 खोल्यांच्या एका घरात राहतो. यात त्याच्या 14 सुना असून 33 नातू तसेच नाती सामील आहेत. 181 लोकांच्या या कुटुंबात महिलांचा बहुतांश वेळ स्वयंपाकघरातच जातो.

या कुटुंबाचा सर्वाधिक खर्च खाण्यावरच होतो. या कुटुंबाला दिवसाला 100 किलो तांदूळ लागतात आणि हा खर्च केवळ दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापुरीत आहे. नाश्त्यामध्ये हे कुटुंब दरदिनी नवनवे पदार्थ खात असतात.

या कुटुंबाला एका दिवसाला 40 किलो चिकन लागते. मांसाहारी पदार्थ तयार करण्यास अधिक वेळ लागत असल्याने ते शाकाहारालाच अधिक प्राधान्य देता. तसेही भाज्या ते परसात उगवत असल्याने त्यांचा मोठा खर्च वाचतो.

घराभोवतीच्या परिसरात ते पालक, कोबी, मिरची, ब्रोकली यांचे पिक घेतात. कुटुंबातील पुरुष शेती आणि प्राणी पाळण्याचे कसब जाणतात. यातून मिळणाऱया पैशातून कुटुंबाचा खर्च चालतो. पण लॉकडाउनमध्ये त्यांच्यासमोर समस्या उद्भवली. भाजी आणि पोल्ट्रीद्वारे उत्पन्न मिळायचे, पण लॉकडाउनमध्ये हा पर्याय उपलब्ध नव्हता.

पण या कुटुंबाला त्याच्या चाहत्यांकडून देणगी मिळते. अनेक लोक आर्थिक मदत करत असल्याचे कुटुंब प्रमुखाने सांगितले आहे. जिओना चाना 1942 मध्ये सुरू झालेल्या ख्रिश्चन समूह चानाचे प्रमुख आहेत. या समुहात अनेक विवाह करण्याची अनुमती असते. आतापर्यंत यात एकूण 400 कुटुंबांची नोंदणी आहे. मुलं जन्माला घालून स्वतःच्या समाजाची संख्या वाढविणे हा यांचा मुख्य उद्देश आहे.

Related Stories

गेहलोतांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या अजय माकन यांचा कट, शांती धारीवालांचा आरोप

Archana Banage

उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका

Amit Kulkarni

दिल्ली सरकार येत्या एक महिन्यात 44 ऑक्सिजन प्लाँट उभारणार-अरविंद केजरीवाल

Archana Banage

दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71%

Tousif Mujawar

शरद पवारांनी घेतली अमित शहांची भेट

Archana Banage

घाऊक महागाई निर्देशांकात वाढ

Patil_p