Tarun Bharat

लॉकडाऊनऐवजी कठोर नियम जारी करा

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी आणि बेंगळूरमधील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सोमवारी बेंगळूरमधील मंत्री, खासदार व आमदारांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री येडियुराप्पा देखील मणिपाल इस्पितळातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. याप्रसंगी लॉकडाऊनऐवजी जमावबंदी आणि कठोर नियम जारी करण्याचा सल्ला विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारला दिला.

राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षातील आमदारांनी केली. शिवाय बेंगळूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी इस्पितळांमध्ये बेड मिळत नसल्याबद्दलही काँग्रेस आणि निजदमधील आमदारांनी सरकारला धारेवर धरले. आमदार रामलिंगारेड्डी यांनी सरकारची भूमिका स्षष्ट करा, अशी मागणी करताच महसूलमंत्री आर. अशोक यांनी तुम्हा सर्वांची मते जाणून घेऊन वैज्ञानिक पद्धतीने चर्चा केल्यानंतर कोरोना नियंत्रणासाठी पावले उचलण्यात येतील, असे सांगितले.

दरम्यान, काँग्रेस आमदारांनी आहार असो किंवा औषधे, त्यांचे योग्य पद्धतीने वितरण करा. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत. तर आणखी एकीकडे अतिदक्षता विभागांमध्ये ऑक्सिजनचा साठा नाही. त्यामुळे तातडीने व्यवस्था करा. राज्यात लॉकडाऊन जारी करण्याऐवजी 144 कलमानुसार जमावबंदी लागू करणे योग्य ठरेल, असे सल्लेही यावेळी आमदारांनी दिले.

…तर आधी 25 हजार रु. जमा करा

यापुर्वी लॉकडाऊन जारी केल्याने जनतेला फटका बसला आहे. जर लॉकडाऊन जारी करायचाच असेल तर आधी लोकांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा करा. कोरोना नियंत्रणासाठी कठोर नियम जारी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असे सल्लेही विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारला दिले.

लॉकडाऊन जारी करणार नाही : येडियुराप्पा

राज्यात लॉकडाऊन जारी करणार नाही, मात्र नाईट कर्फ्यु जारी करण्यात येईल. याबाबत मंगळवारी निर्णय घेण्यात येईल. राज्यपालांचे मत विचारात घेतल्यानंतर अंमित मार्गसूची जारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले. बेंगळूरमधील आठ विभागांमध्ये आठ मंत्री आहेत. त्यांच्या देखरेखीखाली कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

‘तामिळनाडूच्या विरोधाला न जुमानता कर्नाटक मेकेदातू प्रकल्प पूर्ण करणार’

Archana Banage

कर्करोगाच्या उपचारासाठी लागणारी औषधे सवलतीच्या दरात देण्यासाठी प्रादेशिक कर्करोग केंद्रे स्थापन करणार: मुख्यमंत्री

Archana Banage

ग्रामीण भागात मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करुन कोरोनाचा प्रसार रोखणार : गृहमंत्री

Archana Banage

महाराष्ट्र, केरळमधून येण्यास बंदी नाही : डॉ. सुधाकर

Amit Kulkarni

राज्यात 17 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

दोन दिवसात दुसरे आर्थिक पॅकेज

Amit Kulkarni