Tarun Bharat

१५ जूनपर्यंत निर्बंध कायम

Advertisements

राज्यातील जिल्हानिहाय आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार

प्रतिनिधी/मुंबई

महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी होणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. दुसर्या लाटेतील विषाणू झपाटÎाने पसरतो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना पुढील 15 दिवस निर्बंध कायम राहणार असल्याचे सांगितले.सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांनी जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.दुसर्या लाटेत आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याता प्रयत्न करु. पण तरीही कोरोनाचा नवा म्युटेट आणि तिसरी लाटचा सामना करणे कठीण होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनाच्या लढाईत आपण ज्या घोषणा केल्या त्यात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. संजय गांधी,श्रावण बाळ योजनेला 850 कोटी तसेच नोंदणीकृत कामगार ,घरेलु कामगार ,फेरीवाले ,आदिवासी यांना निधी दिला जात असुन जिल्हाधाकर्यांना 3300 कोटीचा निधी मंजुर केला असुन 3865 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मफतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती.  अजूनही आपण म्हणावं तेवढी खाली आलेलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं”, असे मुख्यमंत्री यांनी बोलताना माझे गाव कोरोनामुक्त चळवळ राबविण्याचे आवाहन केले.

आता कोरोनामुक्त गाव ही मोहिम राबवायची आहे`

ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आपण कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. प्रत्येकाने घर कोरोनामुक्त करायचं ठरवलं तर आपलं घर कोरोनामुक्त होईल. माझं घर कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार आणि दोन तरुण सरपंचांनी त्यांच्या गावातून कोरोना हद्दपार केला. आपल्याला कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे आता महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवायची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तौत्के नुकसानग्रस्तांना मदत सुरू

तौत्के हे सगळ्यात भीषण वादळ होतं. हे वादळ गुजरातला धडकले.हे वादळ दरवर्षी आदळत आहेत. याविरोधात सामना करताना तारांबळ उडते. संपूर्ण किनारपट्टीहून लोकांना हलवणं, ते हलवताना कोविडचे नियम पाळणं हे खूप विचित्र असतं,ही अशी संकटं दरवर्षी आपल्याला त्रास देणार असतील तर आपल्या किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची गरज आहे. वादळामध्ये वीज खंडित होते. झाडे उन्मळून पडतात. या गोष्टीचा विचार करुन विजेचा पुरवठा भूमीगत करावा लागेल. तसेच काही घरे भूकंपरोधित बांधावे लागतील. या गोष्टीवर आपण काम करणे सुरु केले  आहे. या बाबतीत पेंद्र सरकारशी बोलणे सुरु केले आहे. मला खात्री आहे पेंद्र आपल्याला या बाबतीत मदत करेल.नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जे निकष आहेत ते पेंद्र सरकारने बदलायला हवेत. जेणेकरुन लोकांना जास्त मदत करता येईल. तसेच किनारपट्टी परिसरात महत्त्वपूर्ण उपाययोजना करावे लागतील. भूकंपरोधक घरं करावे लागतील. पक्के निवारे बांधण्याची गरज आहे. कारण नैसर्गिक आपत्ती आता वारंवार येत आहेत. याबाबत आपण पेंद्र सरकारशी बोलत आहोत. याबाबत पेंद्र सरकारला आपल्याला नक्की मदत करेल.

शिक्षणासाठी केंद्राने समान धोरण ठरवले पाहीजे

कोरोनाचा मुकाबला कराना शिक्षण हा महत्वाचा घटक असल्याने त्याबाबत आता काही क्रांतीकारक निर्णय घेण्याची गरज असुन दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण अंर्तगत मुल्यांकन देऊन पास केले असले तरी आता बारावीचा निर्णय घ्यावा लवकरच आढावा घेऊन घेऊ मात्र याबाबत केंद्राने एकसमान धोरण ठरवले पाहीजे यासाठी हवे तर आपण पंतप्रधानांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रावर निर्बंध नाही

सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकर्यांना खते,बियाणे मिळावीत यासाठी ही दुकाने बंद करण्यात येणार नाहीत मात्र लोकांनी गर्दि टाळली पाहीजे आपण देशाचे अन्नदाते आहात आपण सुरक्षित तर देश सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लहान मुलांना आपल्यापासुन संसर्ग होईल

पहिल्या लाटेत ज्येष्ट लोक ,दुसर्या लाटेत मध्यम वयाच्या लोकांना अधिक संसर्ग झाला आता तिसर्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होणार असल्याचे बोलले जात असले तरी तो संसर्ग आपल्यामुळेच होणार आहे,त्यामुळे आपण काळजी घेतली तर आपण घराला आणि बालकाला सुरक्षित ठेवु शकतो.

अनाथ बालकांचे पालकत्व सरकार घेणार

दुसर्या लाटेत अनेक बालकांनी आपले पालक गमावले असुन या अनाथ बालकांचे पालकत्व सरकार घेईल,त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत सरकार त्यांना सक्षमपणे साथ देईल

रस्त्यावर उतरणार्यांना इशारा

दुसर्या लाटेवर आपण नियंत्रण आणले याचे सर्व देशात कौतुक होत आहे,मात्र हे सगळे यश आपल्या सहकार्याने झाले असुन जर आपल्याला तिसर्या लाटेला निमंत्रण द्यायचे नसेल तर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार्यांना कोरोना विरोधातील लढाईसाठी उतरूया असे मुख्यमंत्री म्हणाले.

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील`

  2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसईल्लविरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

`पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे पालिकांसाठी रू`

 ज्या जिह्यात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील. आवश्यक नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा याबाबतीत स्थानिक आपत्ती

 व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील

 पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे पालिकांसाठी

ज्या पालिका किंवा जिह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे अशा जिह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मफत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणार्या व्यक्तींचा अपवाद असेल.

Related Stories

भोंग्यांसंदर्भातील बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट करत राज ठाकरेंनी सेनेला डिवचले

datta jadhav

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम कदम यांचा ‘दहीहंडी’ उत्सव रद्द करण्याचा निर्णय

Rohan_P

कोल्हापूर : आशा स्वयंसेविका मारहाण प्रकरणातील एकास अटक, तिघे फरार

Abhijeet Shinde

पद्मश्री डॉ. अशोक पानगडिया यांचे निधन

Rohan_P

चंद्रकांत पाटील जगातील सर्व पार्लमेंटच्या जागा जिंकू शकतात ; संजय राऊतांचा खोचक टोला

Abhijeet Shinde

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!