Tarun Bharat

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका: पालकमंत्री जयंत पाटील

सांगली/प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१पासून शंभर टक्के लाॅकडाऊन आशा आशयाचे फेक मेसेज पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही .
तथापि दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबतच्या संबंधित नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात मंगळवार दिनांक 21 जुलै पासून 31 जुलै पर्यंत शंभर टक्के लाॅक डाऊन होणार अशा आशयाच्या कोणत्याही बातम्यांवर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये हे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

त्याच वेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लाॅकडाउन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

Related Stories

सांगली : नाटोली येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात ३७ पॉझिटीव्ह रुग्ण

Archana Banage

सावरकरांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर : सांगलीत भाजपची निदर्शने

Archana Banage

सांगलीला राष्ट्रीय महामार्गावर आणण्यासाठी नितीन गडकरींना निवेदन

Archana Banage

सांगली : सहा जणांचा मृत्यू, 212 रूग्ण वाढले

Archana Banage

नाक्यावर भटक्या प्राण्यांची दादागिरी

Patil_p