Tarun Bharat

लॉकडाऊनचे गांभीर्य हरवले का?

उपनगरांमध्ये मोकाट फिरणाऱयांची संख्या वाढली

बेळगाव / प्रतिनिधी

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परंतु काही जणांकडून या विकेंड लॉकडाऊनला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी शहर तसेच उपनगरांमध्ये नागरिकांचा संचार सुरूच असल्याने लॉकडाऊनचे गांभीर्य हरवले का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. कोरोनाला रोखण्याचे काम पोलिसांचेच आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्य सरकारने अजून काही दिवस लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरिकांचा संचार कमी झाल्यास कोरोनाला आळा बसेल, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात दूध विपेते, वृत्तपत्र विपेते यांची काही प्रमाणात वर्दळ दिसून येत होती. 

विकेंड लॉकडाऊन असतानाही रोजच्याप्रमाणेच नागरिक घराबाहेर पडत होते. थातूरमातूर कारणे देत नागरिक बाहेर पडत असल्याचे दिसून आले. दूध, एटीएम, मेडिकल अशी कारणे देत फिरणाऱयांचे प्रमाण शनिवारी वाढल्याचे दिसून आले. यामुळे इतर नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत होती. नागरिकांच्या कारणांनी पोलीसही त्रस्त झाले आहेत. यामुळे बाहेर फिरणाऱयांना कोरोनाची भीती राहिली नसल्याचेच दिसत आहे.

शहरात मात्र शुकशुकाट

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात मात्र पोलिसांनी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. यामुळे मध्यवर्ती भागात सर्वत्र शुकशुकाट होता. मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा होता.  विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांची नजर होती. नेहमी गर्दीने गजबजणाऱया गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, रविवार पेठ येथे शनिवारी शुकशुकाट होता.

Related Stories

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

Patil_p

उचगाव मठगल्ली रस्ताकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

• थर्टीफस्टला तळीरामांनी रिचवले 1 लाख 87 हजार लीटर मद्य

Patil_p

सुपारी देऊन पत्नीचा खून? निपाणीतील घटना : पतीसह चौघे ताब्यात

Patil_p

म. गांधी उद्यानात विद्यार्थ्यांच्या धोकादायक कसरती

Amit Kulkarni

वाहतूक रोखण्यासाठी संपर्क रस्त्यांवर झाडांचा वापर

tarunbharat