कबनूर/प्रतिनिधी
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन च्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कबनूर यांच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना विषाणू रोगांमुळे मार्च ते मे अखेर शासनाने लॉकडाऊन केले होते. या दरम्यान सर्व व्यवहार उद्योगधंदे बंद होते. परिणामी आर्थिक व्यवहार थंड झाले. नागरिकांना उपासमारी सह मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोर जावे लागत आहे. आर्थिक टंचाईमुळे बेकारी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे. त्यामुळे अतोनात हाल होत आहेत. तेव्हा महावितरण वीज कंपनीने तीन महिन्याचे वाढीव बिल ग्राहकांच्या माथी मारून त्यांना आणखी संकटाच्या खाईत लोटत आहे.
कसंतरी जगण्यासाठी धडपड चालू असताना महावितरण कंपनीने घरगुती साठी वाढलेले वीज दर जनतेच्या माथी मारून अन्याय करीत आहेत. युनिटचे दर वाढलेने वहन आकारही वाढणार आहे. वाढीव वीज बिलामुळे जनतेचे कंबरडे मोडणार आहे तेव्हा अन्यायी वीजदर त्वरित रद्द करून शासनाने तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. मनसे शहराध्यक्ष प्रकाश इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच प्रांताधिकारी यांना भेटून वरील निवेदन दिले.
यावेळी सल्लागार अध्यक्ष स्वप्निल नरंदेकर, तालुकाउपाध्यक्ष सूर्यकांत बनकर, उपशहर अध्यक्ष अभिषेक केटकाळे, युवराज कोळी, पुष्कर कुंभार, निलेश इनामदार, हनुमंत दिंडे, शांतिनाथ कामत, उत्तम कमलाकर, संदीप देशपांडे, हरीश गणवानी आदी उपस्थित होते.


previous post