Tarun Bharat

लॉकडाऊननंतर चीनची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्मयांनी वधारली

वृत्तसंस्था/बीजिंग :

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील विविध देशानी लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामुळे सर्वच देशाची अर्थव्यवस्था रुळावरुन घसरल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु लॉकडाऊनमधून काही प्रमाणात शिथिलता देत उद्योगधंद्याना सुरु करण्यास परवानगी दिली आहे.यामुळे काही प्रमाणात वेग पकडत आहे. याचाच एक भाग म्हणून आता चिनच्या अर्थव्यवस्थेने 3.2टक्क्मयांची वृद्धी नोंदवली आहे. याबाबतची माहिती चीनने गुरुवारी सादर केलेल्या आकडेवारीतून सांगितली आहे.

जगातील अन्य देशाच्या तुलेनत ही आर्थिक वृद्धी उद्योगजगतांसह अन्य क्षेत्रात आश्चर्य निर्माण करणारी ठरली आहे. कारण मागील तिमाहीत हाच अर्थव्यवस्थेचा वेग 6.8 टक्क्मयांनी घटला होता. कोरोनाचा संसर्गाचा प्रारंभ चीनमध्ये डिसेंबरमध्ये झाला होता. तेव्हा सर्वात प्रथम जगात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या काही महिन्यांच्या कालावधीनंतर अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी उद्योगधंदे सुरु करण्यात आले होते. याचाच परिणाम म्हणून दुसऱया तिमाहीत ही समाधानकारक कामगिरी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. 

उपलब्ध माहितीनुसार चीन येथे पुनर्निमाण आणि काही प्रमाणात दुसऱया उद्योगाच्या कामकाजात सामन्य स्थितीत परतत आहेत. परंतु बेरोजगारीचा दर लक्षात घेता ग्राहकांचा खर्च प्रभावीत झाला आहे. चीनमध्ये सिनेमा आणि अन्य काही व्यवसाय सध्याही बंद अवस्थेत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

तिसऱया दिवशी सेन्सेक्सचा टप्पा 39 हजार पार

Patil_p

एमपोकेटकडून होणार 1500 जणांची भरती

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली

Patil_p

रोजगार संधींमध्ये 57 टक्के दमदार वाढ

Patil_p

पोलादाचे दर वाढले

Amit Kulkarni

पहिल्या सहामाहीत घरांच्या विक्रीत 49 टक्क्मयांची घसरण

Patil_p
error: Content is protected !!