Tarun Bharat

लॉकडाऊनमध्येही बेंगळूरची विमान-रेल्वेसेवा राहणार सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव

बेंगळूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने राज्य सरकारने बेंगळूर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि. 14 जुलैपासून या लॉकडाऊनला सुरुवात होणार असून, विमान व रेल्वे प्रवासी संभ्रमात पडले होते. परंतु या काळातही रेल्वे व विमानसेवा आहे त्याप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारने या सेवा बंद करण्याचा आदेश दिल्यानंतरच या सेवा बंद होतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

14 जुलैपासून बेंगळूर लॉकडाऊन होत असले तरी यापूर्वीच प्रवाशांनी रेल्वे व विमानांचे बुकींग केले आहे. त्यामुळे आपल्याला प्रवास करता येणार की नाही, असा प्रश्न प्रवाशांच्या मनात होता. या संदर्भात प्रवासी संबंधित रेल्वेस्थानक व विमानतळावर फोन करून चौकशी करत होते. बेळगावमधूनही बेळगाव-बेंगळूर स्पेशल सुपरफास्ट एक्स्प्रेस धावते तर बेंगळूरला आठवडय़ातून काही दिवस विमानसेवाही सुरू आहे. त्यामुळे हे प्रवासी संभ्रमात सापडले होते.

रेल्वे व विमान बंद करण्याबाबत स्पष्ट आदेश नसल्यामुळे ते सुरूच ठेवण्यात येणार आहेत. ये-जा करणाऱया प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी या सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळ करून न घेता आपल्या ठरलेल्या रेल्वे व विमानाने प्रवास करावयाचा आहे.

राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)

अद्यापपर्यंत बेंगळूर विमानसेवेबद्दल कोणताही आदेश आलेला नाही. तोपर्यंत बेळगाव-बेंगळूर विमानसेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. दि. 14 पासून बेळगाव-बेंगळूर विमानफेरीमध्ये आणखी एका फेरीची वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Stories

खोदलेल्या नवीन काँक्रीटच्या रस्त्याची केली दुरुस्ती

Patil_p

शिवप्रतिष्ठानतर्फे अनगोळमधील किल्ला प्रतिकृतांची पाहणी

Amit Kulkarni

आयएमएचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Patil_p

येळ्ळूर शिवारात दरवळतोय बासमतीचा सुगंध!

Amit Kulkarni

फेम फिएस्टा उत्सवाची थाटात सांगता

Amit Kulkarni

ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय, केआर शेट्टी किंग्ज विजयी

Amit Kulkarni