Tarun Bharat

लॉकडाऊनमध्ये महिलांवर अन्याय होतोय तर ‘वन स्टॉप सेंटर’ची मदत घ्या

प्रतिनिधी / रत्नागिरी


कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागणाऱया महिलांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत नियुक्त केलेल्या महिला वकीलांकडून “ वन स्टॉप सेंटर ” कडून मिळणार मदत असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा पाधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश आनंद सामंत यांनी दिली.
सध्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत महिलांवर होणाऱया अत्याचाराविरूद्ध बाहेर पडून दाद मागणे , कायदेविषयक सहाय्य मिळवणे अडचणीचे होऊ शकते. त्याचा विचार करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला महिला व बालविकास विभाग भारत सरकार यांच्यातर्फे वन स्टॉप सेंटरला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे . त्यामुळे आता कौटुंबिक हिंसाचारापासून पिडीत महिलेला वन स्टॉप सेंटरला संपर्प करता येणार आहे आणि तेथून विधी सेवा प्राधिकरणातर्फे नेमलेल्या वकीलांना कायदेविषयक सल्ल्यासाठी थेट संपर्प करता येणार आहे.
सध्या आपल्या देशामध्ये जगातील सर्वात मोठा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे सर्व लोकांना सामाजिक अंतर ठेवण्याबाबत आणि अलगीकरणाबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत महिला आणि मुले या दुर्बल घटकांना अन्याय, अत्याचाराला अथवा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कौटुंबिक हिंसाचारामध्ये शारिरीक गैरवर्तन उदा . मारहाण करणे , वस्तू फेकून मारणे, लैंगिक गैरवर्तन त्यामध्ये सक्तीचे शरीरसंबंध, अश्लील शब्दांचा वापर, अश्लील चित्रफित बघण्याची सक्ती करणे, शाब्दिक व भावनिक गैरवर्तन यामध्ये घालून – पाडून बोलणे ,चारित्र्यावर संशय घेणे इत्यादी घटनांचा समावेश होतो. तसेच आर्थिक गैरवर्तन त्यामध्ये मुलांचा आणि महिलांचा सांभाळ करण्यास नाकारणे इत्यादी घटनांचा समावेश होतो
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अॅड.विदीशा पावसकर , अॅड. सोनाली रहाटे, अॅड. अक्षता साळवी आणि अॅड. स्मिता कांबळे या चार विधीज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन स्टॉप सेंटरला केलेला दुरध्वनी या वकीलांच्या मोबाईलला जोडला जाणार आहे. त्यासंदर्भात तात्काळ न्यायालयात दाद मागण्याची आवश्यकता असल्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला अनुसरून न्यायालयात दाद मागता येणार आहे.

मुलांना सहाय्य आवश्यक असल्यास सामाजिक अंतर आणि इतर शासकीय विभागांच्या सहकार्याने मदत पुरविली जाणार आहे . रत्नागिरी जिल्हयासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय याठिकाणी 02352 – 220461 या दुरध्वनीवर संपर्प करून पिडीतांना कायदेविषयक सेवा विधी सेवा प्राधिकरणामार्पत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . त्याचप्रमाणे त्याबाबतच्या तक्रारी rtg_dwcdor@rediffmail.comयावर करता येणार आहेत . महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी या केंद्रातून सुविधा पुरविली जाणार असल्याचेही आनंद सामंत यांनी सांगितले.

Related Stories

राज्यव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

रत्नागिरीत क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू

Patil_p

मालवणचे माजी नगरसेवक भालचंद्र उर्फ बाळू कोळंबकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

बांदा आठवडा बाजारात झुंबड

NIKHIL_N

रत्नागिरीतील घडामोडींचे सिंधुदुर्गात पडसाद

NIKHIL_N

श्री प. पू. विनायक राऊळ महाराजांच्या पालखीचे दोडामार्गात स्वागत

Anuja Kudatarkar