Tarun Bharat

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने अनेकजण घरी बसून आता कंटाळले आहेत. 


त्यातच आता गुगलने लॉकडाऊनमध्ये लोकांना घरी कंटाळा येऊ नये म्हणून गुगलने आपल्या डुडलमध्ये कोडिंग गेम दिला आहे. गुगलच्या या डुडल सीरिजमध्ये अनेक लोकप्रिय गेम्स देण्यात आले आहेत.


गुगल किड्स कोडिंगला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये सर्वात आधी कोडिंग लॉन्च केले होते. तेच आता लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा घेऊन आलं आहे.

आज गुगलच्या डुडलमध्ये एक गमतीशीर कोडिंग गेम असून त्यामध्ये एक ससा आहे. हा ससा गाजर एकत्र करत आहे. हा गेम सोपा आहे. या गेममध्ये प्लेयर म्हणजेच, गेम खेळणारे युजर्स सशाला कंट्रोल करू शकतात. हा गेम नॉन प्रोग्रामर्सही खेळू शकतात.

Related Stories

रस्त्यावरील भटकी कुत्री आसामला पाठवा; आसाममध्ये कुत्र्याचे मांस खात असल्याचे बच्चू कडूंचा दावा

Abhijeet Khandekar

22 वर्षीय युवती दफनभूमीची रक्षक

Amit Kulkarni

आळंदी पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट

Archana Banage

नागुर तांडावरील आगीत चार घरे भक्ष्यस्थानी; सुमारे दोन लाखाचे नुकसान

Abhijeet Khandekar

कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली

Archana Banage

‘या’ दोन राज्यांनी छापली स्वत:ची लसीकरण प्रमाणपत्रे,मोदींचा फोटो हटवला

Archana Banage