Tarun Bharat

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी

ऑनलाईन टीम / मुंबई : 

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. तरी देखील राज्यातील सर्व धर्मियांनी प्रचंड संयम दाखवला. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. मात्र, दोन पोलिसांचा या लढाईत मृत्यू झाला, याचे दुःख आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळहळ व्यक्त केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज देशवासियांशी संवाद साधला.  उद्धव म्हणाले, आता रमजानचा महिना आहे. त्यामुळे घरात राहूनच मुस्लिम बांधवांनी नमाज पढावेत. देव हा आता मंदिरात नाही तर संयमात आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफारी कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांमध्ये देव आहे. सर्व कोरोना योद्धांचा आदर करा. ते खूप तणावाखाली काम करत आहेत. दुर्दैवाने दोन पोलीस योध्यानचा या लढाईत मृत्यू झाला त्याचे दुःख आहे.

दरम्यान, संकटकाळात राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिला आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. राजकारण टाळून आपण सर्वजण कोरोनाची लढाई लढत आहोत. तरी देखील जे राजकारण करत आहेत, त्यांना करूद्या.

Related Stories

भारताने दौलत बेग ओल्डी येथे तैनात केला T-90 टँकचा ताफा

datta jadhav

“पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

Archana Banage

“मराठा इतिहास रचतो,” नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

Archana Banage

मुंबईतील पंचतारांकित ललित हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी

datta jadhav

कलानगर पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उद्धव ठाकरे म्हणाले…

Tousif Mujawar

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे ‘विक्रांत’- नरेंद्र मोदी

Archana Banage