Tarun Bharat

लॉकडाऊनमुळे दिल्लीसह 90 शहरांमधील प्रदूषण घटले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे दिल्लीसह 90 शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण घटले आहे.  दिल्लीतवायूप्रदूषणाचे प्रमाण 30 टक्क्यांनी तर पुणे आणि अहमदाबादमध्ये 15 टक्क्यांनी घटले आहे, असे सिस्टिम ऑफ द एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्चने म्हटले आहे.     

देशव्यापी लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी वेगळता सर्व सर्व लोक सध्या घरात आहेत. त्यामुळे देशभरातील वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. उद्योग, बांधकाम आणि वाहतूक ठप्प झाल्याने प्रदूषणाचे प्रमाण घटले. श्वसनासाठी धोकादायक असलेल्या नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण घटले आहे. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन 43, मुंबईमध्ये 38 आणि अहमदाबादमध्ये 50 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे मार्चमध्ये मध्यम स्वरूपाचे  असणारे प्रदूषणाचे प्रमाण आता समाधानकारक ते चांगले असल्याची माहिती एसएएफएआरचे संशोधक गुरफान बेग यांनी दिली.

Related Stories

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात आतापर्यंत 15,294 पोलिसांना बाधा

Tousif Mujawar

भारतातच नाही तर अमेरिकेतही ‘जय श्रीराम’: टाईम्स स्क्वेअरवर झळकणार 3D प्रतिमा

Tousif Mujawar

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Tousif Mujawar

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर

Archana Banage

भारतातील रस्ते २०२४ पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे – नितीन गडकरी

Abhijeet Khandekar

कर्नाटक: डिसेंबरअखेरीस लसीकरण पूर्ण करू : आरोग्यमंत्री

Archana Banage