Tarun Bharat

लॉकडाऊनमुळे बाप्पाही झाले ऑनलाईन

१८० मूर्तीकारांनी घेतला सोशल मीडियाचा आधार

कोल्हापूर / संग्राम काटकर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या पुन्हा जारी केलेला लॉकडाऊन किती दिवस राहिल हे सांगता येणार नाही. अशा परिस्थितीच यंदाचा गणेशोत्सव अवघ्या 30 दिवसांवर आला आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडताच येणार नसल्याने गणेशमूर्तीचे बुकींग करायचे कसे याची चिंता घरगुती गणेशभक्तांना सतावत आहे. मात्र त्यांना आता चिंता करायची गरजच नाही. कारण घरबसल्याच फेसबूक अकाऊंटद्वारे गणेशमूर्ती बुक करता येणार आहे. बुकींगसाठी ‘यावे गणराया’ हे खास अकाऊंट बनविले आहे. यावर पंचविस-पन्नास नव्हे तर तब्बल 180 मूर्तीकारांनी बनविलेल्या विविध आसनांमधील गणेशमूर्ती पाहून बुकींग करता येणार आहे. येत्या शनिवारपासून ( दि. 25 ) बुकींगला सुरुवात केली जाणार आहे.

गणेशोत्सव जवळ आला की गणेशमूर्तीच्या बुकींगसाठी घरगूती गणेशभक्तांची पाऊले कुंभारगल्ल्यांमधील मूर्तीकारांकडे वळू लागतात. जोपर्यंत आवडीची गणेशमूर्ती मिळत नाही, तोपर्यंत गणेशभक्त अनेक मूर्तीकारांकडे पायपीट करतात. असे चित्र दरवर्षीचे पहायला मिळते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरवासियांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणेशमूर्तीचे सहज बुकींग करता यावे यासाठी शाहूपुरी कुंभार गल्लीतील तरुण मूर्तीकार सतिश वडणगेकर यांनी ऑनलाईन बुंकींगचा फंडा काढला आहे. ‘यावे गणराया’ या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांनी शाहूपुरी, गंगावेश आणि बापटपॅम्प या तीन कुंभार गल्ल्यांमधील मूर्तीकार व त्यांनी बनविलेल्या गणेशमूर्तींना अकाऊंटमध्ये समाविष्ट करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत हे काम पूर्ण होईल. शनिवारपासून घरगुती गणेशभक्तांना हे अकाऊंट फेसबुकवर पाहण्यासाठी खुले केले जाईल. जे कोणी अकाऊंटवर सर्चिंग करतील त्यांना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींचे फोटो दिसतील. या गणेशमूर्ती 6 इंचापासून 2 फुटांपर्यंतच्याच असतील. मूर्तींच्यासोबत संबंधीत मूर्तीकारांचे मोबाईलनंबरही गणेशभक्तांना पहायला मिळणार आहेत.

केवळ गर्दी टाळण्यासाठी…

गेल्या 20 दिवसांपासून जिह्यात कोरोना बाधित वाढतच चालले आहेत. यामागे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन एकमेकांच्या संपर्कात जाणे हेच कारण आहे. या कारणाची पुनरावृत्ती घरची गणेशमूर्ती ठरविण्याच्यानिमित्ताने कुंभार गल्ल्यांमध्ये होऊ शकते. त्यामुळे गर्दीच टाळण्यासाठी घरबसल्या फेसबूक अकाऊंटद्वारे गणेशमूर्ती बुकींग करण्याची व्यवस्था केली आहे. तेव्हा गणेशभक्तांनी परिस्थितीचे भान राखत यावे गणराया या अकाऊंटला भेट देऊन गणेशमूर्ती बुकींग करण्याला प्राधान्य द्यावे.

सतिश वडणगेकर ( मूर्तीकार )

Related Stories

रामराजे अन् उदयनराजे यांची पुण्यात खाजगी कार्यक्रमात भेट

Patil_p

सातारकर हादरले; गर्दीला बेक

Patil_p

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 371 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; 8 मृत्यू

Tousif Mujawar

गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना जामीन

Patil_p

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट, 31 बाधित

Archana Banage

कोल्हापुरातील डीएनए विभागासाठी ११.२३ कोटी

Archana Banage