Tarun Bharat

लॉकडाऊनमुळे वाहन निर्यात 73 टक्क्मयांनी घसरली

मुंबई 

 लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रे प्रभावीत झाली असून यामध्ये अत्यावश्यक सेवा सोडून अन्य क्षेत्रांना प्रतिबंध केल्याच्या कारणामुळे देशातील वाहन क्षेत्र मोठय़ाप्रमाणात प्रभावीत झाले आहे. यामध्ये मागील महिन्यात वाहनांची निर्यात मागील वर्षातील समान महिन्याच्या तुलनेत जवळपास 73 टक्क्मयांनी घटून 23.03 कोटी डॉलरवर राहिली आहे. अशी माहिती इंजिनिअरिंग निर्यात संवर्धन परिषदेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. लॉकडाऊनच्या कारणाने पुरवठा व्यवस्था संदर्भात अमेरिका आणि मॅक्सिको सारख्या बाजारातील निर्यात 34 ते 68 टक्क्मयांपर्यंत घरसली आहे. सर्वाधिक काळ उद्योगव्यसाय बंद ठेवण्यात आल्याच्या कारणामुळे पुरवठा व्यवस्था विस्कटली असल्याने निर्यातीला फटका बसल्याचे इंजिनिअरिंग निर्यात संवर्धनचे भारतामधील चेअरमन रवि सहगल यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

टोयोटाच्या नव्या इनोव्हा हायक्रॉसचा टीझर प्रदर्शित

Patil_p

मारूतीची नवी सेलेरियो बाजारात दाखल

Amit Kulkarni

यामाहा मोटर्सने कमी केल्या किंमती

Amit Kulkarni

यामाहाची एफझेड-एक्स 18 जूनला लाँच

Amit Kulkarni

टीव्हीएस मोटर्सची विक्री तेजीत

Patil_p

इलेक्ट्रिक टियागोला मिळतोय दमदार प्रतिसाद

Patil_p