Tarun Bharat

लॉकडाऊन उल्लंघनप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार अनिल चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. गाझीपूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भादंवि कलम-188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या अथवा स्थानिक प्रशासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय अनिल चौधरी यांच्या सांगण्यावरून दिल्ली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाझीपूर सीमेलगत असलेल्या मजुरांना आपल्या खासगी गाड्यांमधून सीमेपार नेले. त्यामुळे लोकांना भडकवून गर्दी जमवल्याप्रकरणी चौधरींवर भादंवि कलम-188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना पोलिसांनी घरातच स्थानबद्ध केले असून, त्यांना आता पोलिसांच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

Related Stories

ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान

Tousif Mujawar

बिहार, बंगाल, त्रिपुरामध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक

Patil_p

भारतात यंदा सरासरीएवढा पाऊस

prashant_c

सप्टेंबरमध्ये 95,480 कोटी रुपयांचा महसूल संकलित

Tousif Mujawar

यंदा 1 जूनला केरळात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता

Archana Banage

म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात तीव्र निदर्शने

Patil_p
error: Content is protected !!