Tarun Bharat

लॉकडाऊन काळात शहराच्या प्रदूषणात 36 टक्क्मयांनी घट

पण लॉकडाऊन शिथिल होताच यामध्ये आता 15 टक्क्मयांची वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. पण लॉकडाऊनमुळे नागरिक अडचणीत आले असले तरी निसर्ग शुद्धीकरणासाठी उपयोगी ठरले आहे. लॉकडाऊननंतर बेळगावच्या प्रदूषणात 36 टक्क्मयांनी घट झाली होती. पण लॉकडाऊन शिथिल होताच यामध्ये आता 15 टक्क्मयांची वाढ झाली आहे.

शहराचे वातावरण शुद्ध असल्याने प्रत्येक नागरिक बेळगावच्या प्रेमात पडतो. शहराच्या सभोवती कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द आणि व्हॅक्सिन डेपोसारखे पर्यावरण शुद्ध करणारा निसर्ग लाभल्याने शहराचे प्रदूषण कमी आहे. पण वाहनांमुळे आणि रस्त्यांमुळे होणाऱया प्रदूषणामुळे शहराचे पर्यावरण खराब होत चालले आहे. शहराच्या विकासासाठी आणि रस्ते रुंदीकरणासाठी शहर आणि उपनगरातील  हजारो झाडांची कत्तल मागील काही वर्षात करण्यात आली. त्यामुळे बेळगावच्या तापमानात वाढ झाली आहे. एरवी एप्रिल-मे महिन्यात 30 ते 32 डीग्री सेल्सियस असणारे तापमान 38 ते 40 डीग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. मागील दोन वर्षांत तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.

यंदा कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे मार्चअखेर पासून शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी बेळगावमध्ये 80 ते 115  पीएम (एक्मयूआय) प्रदूषण होते. 23 मार्चनंतर लॉकडाऊननंतर बेळगावच्या प्रदूषणात घट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये वाहनांची वर्दळ थांबली होती. तसेच वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण आणि रस्त्याच्या धुळीचे प्रदुषण कमी झाले होते. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधित सरासरी 60 पीएम प्रदूषण झाले होते. या कालावधीत 36 टक्के प्रदूषण कमी झाले होते. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्याने वाहनांची वर्दळ वाढली. त्यामुळे हवेचे प्रदूषण आणि धुळीमुळे 15 पीएम प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे सध्या 75 पीएम प्रदूषण झाले आहे.

वास्तविक, लॉकडाऊन कालावधी संपूर्ण वाहतूक बंद होती. उद्योगधंदे, व्यवसाय, कार्यालये, परिवहन सुविधा, औद्योगिक वसाहत सर्व बंद असल्याने प्रदूषणात घट होणे आवश्यक होते. पण ऑटोनगर येथे भाजीमार्केट स्थलांतरामुळे परिसरातील प्रदूषणात म्हणावी तशी घट झाली नाही. प्रदूषण मोजमाप करण्याचे यंत्र ऑटोनगर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात बसविण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनांमुळे प्रदूषणात केवळ 36 टक्के घट झाल्याचे दिसून आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाव्यतिरिक्त शहरात अन्य कोणत्याच ठिकाणी प्रदूषणाचे मोजमाप केले जात नाही. त्यामुळे एकाच केंद्रातील मोजमापाद्वारे शहराचे प्रदूषण निश्चित केले जाते. त्यामुळे शहराच्या प्रदूषणात नेमकी किती घट झाली हे सांगता येणे अशक्मय आहे.

Related Stories

कॅन्टोन्मेंटने थकवली सहा कोटीची बिले

Patil_p

पिरनवाडी येथील सेक्युरिटी गार्ड बेपत्ता

Amit Kulkarni

चौथ्या रेल्वेगेटमध्ये पुन्हा बिघाड

Amit Kulkarni

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अक्षता कामतीला सुवर्ण

Amit Kulkarni

इस्लामिया संघाने पटकाविला एमएसडीएफ चषक

Amit Kulkarni

शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी

Patil_p