Tarun Bharat

लॉकडाऊन काळात 1 कोटीची दंडवसुली

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यात संचारबंदी काळातही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक शाखेने केलेल्या धडक कारवाईत 22 मार्च ते 10 जुलै 2020 या 121 दिवसांत 38 हजार 417 वाहनचालक कारवाईच्या कचाटय़ात सापडले. त्यांच्याकडून 1 कोटी 35 लाख 65 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

  गेल्या वर्षी एप्रिल, मे आणि जून 2019 या तीन महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 13 हजार 713 वाहनचालकांवर कारवाई करून 29 लाख 10 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला होता. लॉकडाऊनमधील 121 दिवसांत   सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट वाहन चालकांवर झाली आहे. अशा 16  हजार 923 वाहन चालकांकडून 84 लाख 61 हजार 500 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

 नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. न केल्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

चौकट….

नियमांचे उल्लंघन करणाऱयांना झालेला दंडः

@सीट बेल्टचा वापर न करणारे- 1956 चालकांना 3 लाख 91 हजार 200 दंड.

@वाहन चालवताना मोबाईलचा वापर- 92 जणांना 18 हजार 400 रुपये दंड.

@इन्शुरन्स नसणे- 105 जणांकडून 1 लाख 31 हजार 800 रुपये दंड.

@लायसन्स नसणे- 589 जणांना 2 लाख 94  हजार 500 रुपये दंड.

@पॅन्सी नंबर प्लेटचा वापर- 741 जणांना 1 लाख 63 हजार 400 रुपये दंड

@अधिकृत कागदपत्र नसणे- 7 हजार 73 जणांकडून 14 लाख 14 हजार 600 रु. दंड

@ट्रिपल सीट – 376 जणांकडून 75 हजार 200 रु. दंड

@इतरमध्ये बेकायदा वाहतूक, धूमस्टाईल, राँगसाईड आदी- 10 हजार 562 जणांकडून 26 लाख 14 हजार 800 रुपयांचा दंड.

Related Stories

जिल्हय़ातील 11 आरा गिरणी परवाने रद्द!

Patil_p

हरिहर नाचणोलकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

कुडाळ प्रांताधिकारी सक्तीच्या रजेवर

NIKHIL_N

नवदाम्पत्याची गळफासाने आत्महत्या

Patil_p

योगेश कदमांचे विधान बालिशपणाचे – खा. सुनील तटकरे

Archana Banage

‘क्वारंटाईन’प्रश्नी प्रशासनाची बेपर्वाई

NIKHIL_N