Tarun Bharat

लॉकडाऊन काळात 2.55 कोटीची बेकायदेशीर दारूसह इतर साहित्य जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊन काळात बेकायदेशीररित्या गावठी दारूसह परराज्यातून आलेली दारू वाहतूक करताना अबकारी खात्याने जप्त केली. याचबरोबर काही ठिकाणी धाडीही टाकल्या. बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, हावेरी या जिल्हय़ामध्ये 3,300 अबकारी धाडी टाकून 404 प्रकरणांची नोंद केली. 185 जणांना अटक केली. याचबरोबर 17,887 लिटर दारू जप्त केली, अशी माहिती अबकारी उपायुक्त वाय. मंजुनाथ यांनी दिली आहे.

लॉकडाऊन काळामध्ये बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणे तसेच विक्री करताना अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परराज्यातून येणारे 106 लिटर दारू जप्त करण्यात आली. 14,118 बॉटल जप्त करण्यात आल्या. 98 लिटर काजू फेणी, 80 लिटर संत्रा, 3613 लिटर गावठी दारू, 4825 गुळाच्या ढेपी, 26.84 लिटर रसायन, 268 दुचाकी वाहने, जप्त करण्यात आली आहेत.

24 एप्रिल ते 3 मे पर्यंत धाडी टाकून इतकी बेकायदेशीररित्या दारू जप्त करण्यात आली असून याची किंमत 2.55 कोटी रुपये असल्य़ाचे त्यांनी सांगितले. बेळगाव अबकारी खात्याने अधिक धाडी टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे बेळगाव विभागातील अबकारी अधिकाऱयांचे तसेच पोलिसांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

Related Stories

समुदाय भवन बनले अवैध प्रकारांचा अड्डा

Amit Kulkarni

कोणताच झेंडा नको घेऊ हाती!

Patil_p

विधानपरिषदेसाठी 99.97 टक्के मतदान

Amit Kulkarni

भारत बंदला शेतकऱयांसह विविध संघटनांचा पाठिंबा

Patil_p

आरपीडी कॉलेजमध्ये प्रेमचंद जयंती साजरी

Amit Kulkarni

भटकळ येथे सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p