कोरोनाच्या भयावह उदेकामुळे सध्या दिल्लीला पुन्हा लॉकडाऊनचे ग्रहण लागले आहे. व्यापारउदीम, शिक्षण, बाजारपेठा सारे काही बंद आहे. याचा त्रास दिल्लीकरांना होणे स्वाभाविक आहे. परंतु, दिल्लीपासून दूर उत्तरप्रदेशात असणाऱया अलीगढ येथील कुलूप निर्मिती व्यवसाय या लॉकडाऊनमुळे धोक्यात आला आहे. अलीगढ हे कुलूपे बनविण्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. येथील छोटय़ा छोटय़ा कारखान्यांमध्ये बनलेली कुलूपे तामिळनाडू, केरळपर्यंत विकली जातात. तथापि, सर्वात मोठी बाजारपेठ या कुलूपांना दिल्लीतच लाभते. प्रतिदिन छोटीमोठी दोन लाख कुलूपे दिल्लीत विकली जातात. आता दिल्लीच बंद असल्याने कुलूपे बनविणाऱया कारागिरांच्या घरच्या चुली थंड पडण्याची चिंता व्यक्त होत आहे. अलीगढचेच अनेक कारागिर दिल्लीमध्ये कामाला आहेत. अलीकडचा हा कुलूपे बनविण्याचा व्यवसाय त्यांनी दिल्लीतही नेला आहे. पण लॉकडाऊनमुळे हे सारे कामगार अलीगढला येतील. त्यामुळे स्थानिक कारागिरांना मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. दिल्लीहून परतलेल्या या कारागिरांनी अलीगढमध्ये कुलूप निर्मिती उद्योग सुरू केला तर स्थानिकांच्या पोटावर पाय येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे अलीगढचे दिल्लीतील लॉकडाऊनकडे बारकाईने लक्ष आहे.


previous post
next post