Tarun Bharat

लॉकी फर्ग्युसनने केले विजयाचे ‘लॉकिंग’!

Advertisements

थरारक टायनंतर सुपरओव्हरमध्ये केकेआरची एकतर्फी बाजी, हैदराबादला फलंदाजीतील अपयश नडले

वृत्तसंस्था / अबुधाबी

भेदक जलद गोलंदाजीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करुन सोडणाऱया लॉकी फर्ग्युसनच्या लक्षवेधी योगदानामुळे कोलकाता नाईट रायडर्सने सुपरओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध एकतर्फी विजय संपादन केला.  20 षटकातील लढत टाय झाल्यामुळे या सामन्याचा निर्णय सुपरओव्हरमध्ये घेण्यात आला. सुपरओव्हरमध्ये हैदराबादला 2 बाद 2 धावा करता आल्या तर केकेआरने सहज विजय प्राप्त केला.

तत्पूर्वी, निर्धारित षटकांच्या लढतीत केकेआरने 5 बाद 163 धावा केल्यानंतर हैदराबादला देखील 20 षटकात 6 बाद 163 धावाच करता आल्या आणि त्यामुळे ही लढत टाय झाली होती. सुपरओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने डेव्हिड वॉर्नर व समद यांचा त्रिफळा उडवला, त्यामुळे केकेआरसमोर 3 धावांचे लक्ष्य होते. फर्ग्युसनने त्यापूर्वी 20 षटकांच्या लढतीत देखील 15 धावातच 3 बळी घेतले होते.

निर्धारित लढतीत सनरायजर्स संघाला वॉर्नरच्या नाबाद 47 धावांच्या खेळीमुळे सामना टाय करता आला. सनरायजर्सने आंद्रे रस्सेलच्या डावातील शेवटच्या षटकात 18 धावा केल्या व यामुळे हा सामना टाय झाला होता. फर्ग्युसनने तिखट मारा करताना विल्यम्सनला शॉर्ट बॉलवर, गर्गला स्लोअर वनवर तर पांडेला यॉर्करवर तंबूचा रस्ता दाखवला. सामन्यात त्याने 5 (20 षटकांच्या लढतीत 3 व सुपरओव्हरमध्ये 2) बळी घेतले. आणि यामुळे केकेआरला पूर्ण 2 गुण वसूल करता आले.

केकेआरच्या डावात इयॉन मॉर्गन व दिनेश कार्तिक या आजी-माजी कर्णधारांची आक्रमक फलंदाजी ठळक वैशिष्टय़ ठरले. मॉर्गनने 23 चेंडूत 34 तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूतच 29 धावांची आतषबाजी केली. नेतृत्व सोडल्यानंतर दिनेश कार्तिकची फलंदाजी येथे प्रथमच बहरली. मॉर्गनच्या डावात 3 चौकार व बसिल थाम्पीच्या गोलंदाजीवर मिडविकेटकडे खेचलेल्या षटकाराचा समावेश राहिला. कार्तिकने 2 चौकार व तितकेच षटकार वसूल केले. सनरायजर्स या पराभवानंतर 6 गुणांवर कायम असून त्यांच्यासमोर प्ले-ऑफला मुकण्याचा धोका असणार आहे.

धावफलक

केकेआर : शुभमन गिल झे. गर्ग, गो. रशीद खान 36 (37 चेंडूत 5 चौकार), राहुल त्रिपाठी त्रि. गो. नटराजन 23 (16 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), नितीश राणा झे. गर्ग, गो. शंकर 29 (20 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), आंद्रे रसेल झे. शंकर, गो. नटराजन 9 (11 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन झे. पांडे, गो. बसिल थाम्पी 34 (23 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), दिनेश कार्तिक नाबाद 29 (14 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 5 बाद 163.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-48 (त्रिपाठी, 5.6), 2-87 (शुभमन, 11.4), 3-88 (नितीश राणा, 12.1), 4-105 (रसेल, 14.6), 5-163 (मॉर्गन, 19.6).

गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-27-0, बसिल थाम्पी 4-0-46-1, टी. नटराजन 4-0-40-2, विजय शंकर 4-0-20-1, रशीद खान 4-0-28-1.

सनरायजर्स हैदराबाद : जॉनी बेअरस्टो झे. रस्सेल, गो. वरुण 36 (28 चेंडूत 7 चौकार), केन विल्यम्सन झे. राणा, गो. फर्ग्युसन 29 (19 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), प्रियम गर्ग त्रि. गो. फर्ग्युसन 4 (7 चेंडू), डेव्हिड वॉर्नर नाबाद 47 (33 चेंडूत 5 चौकार), मनीष पांडे त्रि. गो. फर्ग्युसन 6 (7 चेंडू), विजय शंकर झे. शुभमन गिल, झे. कमिन्स 7 (10 चेंडू), अब्दुल समद झे. शुभमन, गो. शिवम मावी 23 (15 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), रशीद खान नाबाद 1 (2 चेंडू). अवांतर 10. एकूण 20 षटकात 6 बाद 163.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-58 (केन विल्यम्सन, 6.1), 2-70 (प्रियम गर्ग, 8.4), 3-70 (बेअरस्टो, 9.2), 4-82 (मनीष पांडे, 11.3), 4-82 (मनीष पांडे, 11.3), 5-109 (विजय शंकर, 15.2), 6-146 (अब्दुल समद, 18.6).

गोलंदाजी : पॅट कमिन्स 4-0-28-1, शिवम मावी 3-0-34-1, चक्रवर्ती वरुण 4-0-32-1, आंद्रे रस्सेल 2-0-29-0, लॉकी फर्ग्युसन 4-015-3, कुलदीप यादव 3-0-18-0.

Related Stories

भारताच्या यू-17 महिलांचा स्वीडनकडून पराभव

Patil_p

ऑलिंपिक हॉकीपटू अशोक दिवाण यांचे मायदेशी आगमन

Patil_p

भारत-इंग्लंड यांच्यात आज पहिली टी-20

Patil_p

डी कॉक द.आफ्रिकेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p

ब्रेथवेटचे शतक हुकले, विंडीजला आघाडी

Patil_p

इंग्लंडचा पाकवर एकतर्फी मालिकाविजय

Patil_p
error: Content is protected !!