Tarun Bharat

लॉक डाऊननंतर परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी महाराष्ट्रातून गाड्या सोडा : अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

ऑनलाईन टीम / मुंबई :

लॉक डाऊनची मुदत संपल्यावर रेल्वे सुरू झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी करते करतील. त्यामुळे हिरवे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडाव्यात आणि त्यांचे आधीच नियोजन करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. 

या संदर्भातील पत्रच अजित पवार यांनी पियुष गोयल यांना दिले आहे. अजित पवार या पत्रात म्हणतात की, केंद्र सरकारने 24 मार्च पासून देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यापासून उत्तर प्रदेश,  बिहारसह विविध राज्यातील मजदूर महाराष्ट्रात अडकून पडले आहेत.

राज्यशासनातर्फे त्यांच्यासाठी शिबिरव्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवली जात आहे. राज्य सरकारच्या या शिबिरामध्ये सध्या साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारे तितक्याच मजुरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. टालेबंदीमुळे त्यांच्या हाताला सध्या काम नाही आहे.

दिड महिन्यापासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपल्या घरी जाण्यास उत्सुक आहेत. पहिल्या देशव्यापी टाळेबंदी समाप्ती दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात झालेली गर्दी त्याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे तीन मे रोजी शिवा केंद्राने ठरवल्याप्रमाणे टाळेबंदी संपल्यावर जेव्हा केव्हा रेल्वे सेवा सुरू होतील तेव्हा परराष्ट्र आतील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणाहून विशेष  रेल्वे गाड्या सोडल्यास या मजुरांना सुरक्षित आपल्या घरी जाता येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. 

त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने या परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे असे म्हटले आहेत. 

Related Stories

“तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ”; राहुल गांधींची मोदींवर टीका

Archana Banage

जम्मू काश्मीर : 16 ऑगस्टपासून सुरु होणार धार्मिक स्थळे

Tousif Mujawar

किरीट सोमय्या कराडवरून मुंबईकडे रवाना

datta jadhav

अमेरिका : हवेत दोन विमानांची धडक; आठ जणांच्या मृत्यूची शक्यता

datta jadhav

कोरोना संकट : पश्चिम बंगालने 31 जुलैपर्यंत वाढवला लॉक डाऊन

Tousif Mujawar

पीएम मोदींनी ‘मन की बात’मधून साधला महाराष्ट्रातील डॉ. शंशाक जोशी यांच्याशी संवाद

Archana Banage