Tarun Bharat

लॉक डाऊन संपल्यावर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम : शरद पवार

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


कोरोना संकटाची मोठी झळ अर्थव्यवस्थेला बसली आहे. कारण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 


ते म्हणाले,  या संकटाचा सामना करण्यासाठी आता सर्वांना एकत्र येऊन मार्ग काढावा लागणार आहे. लॉक डाऊनमुळे गेल्या 40 दिवसांपासून सगळे काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 


राज्य सरकारचा 2020-2021 चा जो अर्थसंलकल्प सादर केला होता, त्यात एकंदर राज्याचे महसूल उत्पन्न तीन लक्ष 47 हजार कोटीच्या आसपास जाईल, असे चित्र दिसत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आज सुधारित  माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असे दिसत असल्याची चिंता व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. असे असले तरी महापालिका, शासकीय यंत्रणेने कार्यक्रम हाती घेतला असला तरी ही संख्या वाढत आहे. सर्व कोरोनाचे रुग्ण असतात असे नाहीत. एकंदर आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेत आहोत, असे सांगून ते म्हणाले सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. गरज असेल तर बाहेर पडा अन्यथा घरीच राहा, असे आवाहन केले.

Related Stories

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू; बिहार,दिल्लीत सर्वाधिक बळी!

Tousif Mujawar

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

Tousif Mujawar

…तर आम्हाला फाशी द्या – नवनीत राणा

Archana Banage

ग्रामपंचायत विधेयकावरुन भाजपचा सभात्याग

Tousif Mujawar

भ्रष्ट, कामचुकार कर्मचाऱ्यांवर होणार सर्जिकल स्ट्राईक

datta jadhav

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे तीन बळी, 177 पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!