Tarun Bharat

लॉजवर पोलिसांचा वॉच वाढणार कधी?

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

अल्पवयीन मुलांना गैरकृत्याकरीता लॉज उपलब्ध करुन देणारा लॉज मालक शंकर शिवाजी चोरगे (रा. कोंढवे) याला सातारा तालुका पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. या अटकेनंतर सातारा शहरातील अनेक लॉज/रूमवर असे गैरकृत्य होत असताना पोलीसांकडून कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त जुगाराच्या अड्डयावर कारवाई करणारे पोलीस लॉजवर कारवाई करत नसल्याने अनेक अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी पडत आहेत.

तालुका पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने लॉजवर नेवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील ही मुले अल्पवयीन आहेत. याची कल्पना असताना अल्पवयीन मुलाला गैरकृत्य करण्यासाठी कोंडवे ता. सातारा येथील शंकर चोरगे याने स्वतःच्या मालकीचा लॉज उपलब्ध करुन दिल्याने त्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी पोलीस ठाण्याच्या पदभार स्विकारल्यानंतर लॉज मालकावर केलेली पहिलीच कारवाई आहे. यामुळे सातारा शहरातील तसेच उपनगरात असे अनेक लॉज आहेत. या लॉजवर अशा घटना घडतात का ? यांची पाहणी करणे गरजेचे झाले आहे. परंतु पोलीसांकडून लॉज मालकांवर कारवाई नाहीच तर साधी चौकशीही करण्यात येते का हा मोठा प्रश्न आहे. यामुळे लॉज मालक काही पैसे मिळतात म्हणून अशी गैरकृत्ये करण्यासाठी मुलांना पाठबळ देत असल्याचे निदर्शनास येत आहे.

….तरच अत्याचाराच्या घटनांना आळा

फक्त गैरकृत्ये करणारी मुलेच नाही तर महाविद्यालयीन मुले-मुली यांचे लॉजवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. काही तासासाठी लॉज मालक लॉज उपलब्ध करून देत असल्याने मुलांकडून यांचा फायदा घेत अशा घटना घडत आहेत. यात मुलींची फसवणूक झाल्यानंतर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल होवूनही लॉज मालकांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने लॉजवर बेकायदेशीर कृत्ये करण्यात येत आहेत.

आता लॉज मालकांवर होणार कारवाई

शहरातील तसेच उपनगरातील लॉज मालकांनी त्यांच्या लॉजवर राहण्यास येणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण नीट माहिती घ्यायला पाहिजे. काही जोडपे नवरा-बायको आहेत असे भासवत लॉजवर राहतात. तसेच अल्वपयीन मुले-मुली यांना लॉजवर राहण्यास परवानगी दिल्याचे आढळल्यास थेट कारवाई होणार आहे. आता पोलीस लॉजवर वॉच वाढविणार असल्याने लॉज मालकांनी नियमांचे पालन करावे.
अजित बोऱ्हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक

Related Stories

वाई पालिकेने खोदल दोन दिवसात कृत्रिम तळे

Patil_p

Satara; डॉल्बीला परवानगी नाहीच; कायदा मोडेल त्यांच्यावर कारवाई होणार

Abhijeet Khandekar

माथाडी कामगारांना लवकरच घरे उपलब्ध होणार

datta jadhav

सातारा : जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Abhijeet Shinde

माळशिरसच्या युवकाचा तडवळे येथे अपघाती मृत्यू

datta jadhav

‘लोक बिरादरी’साठी 6 हजार किलोमीटर सायकलिंग!

datta jadhav
error: Content is protected !!