Tarun Bharat

लॉजिंग बनतायत काळ्या धंद्याचे केंद्र

Advertisements

उचगाव / वार्ताहर

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत व कोल्हापूर हूपरी मार्गावर अनेक लॉजिंग असून काही लॉजिंगमुळे युवक-युवतींच्या आयुष्याने वाईट टर्न घेतला आहे.तरुणाईला वाईट मार्गाने नेताना काही लॉजिंगमध्ये खुलेआम काळे धंदे चालू असल्याने परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निळ्या ‘आकाशाच्या’ वरदहस्ताखाली हे काळे धंदे राजरोसपणे चालू असल्याची जनतेत चर्चा आहे.
महामार्ग तसेच कोल्हापूर हूपरी मार्गावर तसेच गांधीनगर परिसरात शैक्षणिक संकुल,व्यापारी पेठ व अन्य व्यवसाय आहेत . या लॉजिंगच्या दारात सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात टू व्हीलर दिसून येतात.

पर्यटकांना राहण्याच्या दृष्टीने लॉजिंगचा वापर होणे अपेक्षित आहे. मात्र या लॉजिंगमध्ये कोणते पर्यटक येतात याचे उघडगुपित पोलिसांना देखील माहिती असल्याची चर्चा आहे. येथील लॉजिंग मधील रुमचे दर हे तासावर आकारले जातात. इथे रूम साठी 2 तासाला ४०० ते १५०० रू दर आहेत. या परिसरातील लॉजिंग मध्ये अनेक वेळा अल्पवयीन युवक-युवतीचा वावरही आढळून येतो.

या परिसरात अत्याधुनिक एसी सुविधा असणारे लॉजिंगही आहेत. यामुळे या व्यवसाया मधून मोठ्या प्रमाणात लॉजिंग मालकांची चांदी होत असल्याचे दिसते. येथील हुपरी रस्त्यावर असणाऱ्या लॉजवर शेजारील जिल्ह्यातून गिऱ्हाईक येतात एवढी प्रसिद्धी झाली आहे. या परिसरातील लॉजिंग मधून अनेक काळे धंदे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

पोलिसांचे वाहन ही जेवणाचे पार्सल घेण्यासाठी या परिसरातील हॉटेल व लॉजिंग समोर अनेक वेळा थांबल्याचे नागरिकांना आढळून आले आहे. अनैतिक कृत्यांचे आगार असणाऱ्या या परिसरातील लॉजिंग वर पोलीस कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाहीत असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. लॉजिंगमध्ये एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Related Stories

शहरात आता दिवसरात्र कचरा उठाव

Abhijeet Shinde

पोटनियम दुरुस्तीचा ठराव गदारोळात मंजूर

Kalyani Amanagi

किरण ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Abhijeet Shinde

पुढील आठवडयानंतर आंबा दर कमी होणार

Abhijeet Shinde

खेबवडे येथे भिंत कोसळून दोन दुभती जनावरे गंभीर जखमी

Abhijeet Shinde

संदीप देसाई ! राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!