Tarun Bharat

लोंगेवाला युद्धाचे हिरो कर्नल धर्मवीर कालवश

Advertisements

छोटय़ा तुकडीने पाकिस्तानला पाजले होते पाणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय सैनिकांच्या अदम्य साहसाने ज्या लोंगेवालाचे युद्ध जिंकले गेले हेत, त्या युद्धाचे महानायक कर्नल धर्मवीर यांचे सोमवारी निधन झाले आहे. युद्धावेळी लेफ्टनंट म्हणून तैनात धर्मवीर यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी जैसलमेरच्या लोंगेवाला चेकपोस्टवर तैनात होती. मध्यरात्रीच्या सुमारास 2500 सैनिक आणि 65 रणगाडय़ांसह पाकिस्तानी सैन्याने याच चेकपोस्टच्या माग्x& नवी दिल्लीपर्यंत धडक मारण्याचा कट रचला होता. परंतु मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वात आणि लेफ्टनंट धर्मवीर यांच्या नेतृत्वाखालील छोटय़ा तुडकीने पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारली होती.

या युद्धाचे हिरो कर्नल धर्मवीर यांचे गुरुग्राम येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. कर्नल धर्मवीर यांनी 92 ते 94 पर्यंत 23 व्या पंजाब बटालियनचे नेतृत्व केले होते. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील लोंगेवाला युद्धावर बॉर्डर हा सुपरहिट चित्रपट तयार करण्यात आला होता.

90 सहकाऱयांसह लढा

ब्रिगेडियर चांदपुरी यांच्या नेतृत्वात जैसलमेरच्या लोंगेवाला चेकपोस्टवर केवळ स्वतःच्या 90 सहकाऱयांसह पाकिस्तानच्या 2000 हून अधिक सैनिकांचा मुकाबला करण्यात आला होता. पाकिस्तानने मध्यरात्री चेकपोस्टवर 65 रणगाडय़ांसह हल्ला सुरू केला होता. रात्रीचा वेळ नसल्याने भारतीय सैन्याला वायुदलाची मदत मिळाली नव्हती. अशा स्थितीत लेफ्टनंट धर्मवीर यांच्या नेतृत्वात सैनिकांनी पूर्ण रात्र स्वतःच्या अदम्य साहसासह पाकिस्तानी सैनिकांना रोखून धरले होते. त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे. पाकिस्तान सैनिक आणि त्यांच्या रणगाडय़ांना भारतीय सैनिकांनी नेस्तनाबूत केले होते.

पाकिस्तानचा कट

बांगलादेश म्हणजेच तत्कालीन पूर्व पाकिस्तानात सपशेल पराभव झाल्यावर पाकिस्तानने लोंगेवालामार्गे नवी दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा कट रचला होता. याच कटाच्या अंतर्गत त्याने 2500 सैनिकांसह 65 रणगाडे आणि 1 मोबाइल इन्प्रंटी ब्रिगेडसह लोंगेंवाल पोस्टच्या दिशेने कूच केली होती. याची कल्पना आलेल्या भारतीय सैन्याच्या छोटय़ा तुकडीसमोर केवळ. चेकपोस्ट सोडून मागे हटणे आणि पूर्ण शक्तिनिशी मुकाबला करणे हे दोन पर्याय होते. ब्रिगेडियर चांदपुरी यांनी मुकाबला करण्याचा निर्देश दिला होता.

रात्रभर केला मुकाबला

 शत्रूच्या रणगाडय़ांचा अणि वाहनांचा 20 किलोमीटर लांब ताफा होता. केवळ काही सैनिकांनी चेकपोस्टसमोर भूसुरुंगांचे जाळे पेरले. तर चेकपोस्टपासून केवळ 30 मीटर अंतरावर पाकिस्तानच्या तोफा धडधडू लागल्या होत्या. लेफ्टनंट धर्मवीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शूरांनी  अँटीटँक गनद्वारे पाकिस्तानी रणगाडय़ांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. भूसुरुंगामुळे पाकिस्तानचे रणगाडे नष्ट होऊ लागल्यावर त्याची पिछेहाट झाली, मग भारतीय सैनिकांनी रात्रभर त्याच्याशी मुकाबला केला. लोंगेवालाचे युद्ध भारतीय सैन्याचे साहस, शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.

Related Stories

हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ

Sumit Tambekar

कोरोना : दिल्लीत रुग्णांनी ओलांडला 6.33 लाखांचा टप्पा

Rohan_P

पावसाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग

Patil_p

सत्तेवर आल्यास मुलींना स्मार्टफोन अन् स्कुटी

Amit Kulkarni

बनावट ‘रेमडेसिवीर’ तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 5 अटकेत

datta jadhav

दिल्लीत 128 नवे कोरोना रुग्ण; 157 जणांना डिस्चार्ज

Rohan_P
error: Content is protected !!