तरुण भारत

‘लोककल्प’तर्फे मोफत चष्मे वितरण

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनतर्फे आमटे गावात मोफत चष्मे वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. लोकमान्य सोसायटीने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत एप्रिल महिन्यात आमटे गावातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून निदान, मार्गदर्शन केले होते व रुग्णांची नोंदणी केली होती. या कार्यक्रमात 50 ग्रामस्थांना मोफत चष्मे देण्यात आले. या कार्यक्रमाला पीएसीएस बँकेचे अध्यक्ष लक्ष्मण कासर्लेकर, संतोष कदम, निंगाप्पा बालाजी, विष्णू गावकर, सुरेश गावकर आणि इतर उपस्थित होते.

Advertisements

जांबोटी व कणकुंबी परिसरातील घनदाट जंगलात वसलेली 30 गावे दत्तक घेण्यात आली असून गावकऱयांचे राहणीमान सुधारण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत व त्यांना उपजीविकेची संधी प्राप्त करून देण्यात येत आहे. 

Related Stories

हिंडलगा येथे लेप्रसी रुग्णालय सुरू

Amit Kulkarni

बेळगाव-कोल्हापूर बसफेऱया वाढल्या

Amit Kulkarni

देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

Omkar B

ऍग्रीगोल्डमधील रक्कम परत करा

Patil_p

अधिकाऱयांनी पूरनियंत्रणासाठी सज्ज रहावे

Patil_p

खानापूर तालुक्यात गुरुवारी तिघांना कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!