Tarun Bharat

लोकमान्यच्या तिस्क उसगांव शाखेतर्फे शिक्षकांचा सन्मान

वार्ताहर / उसगांव

लोकमान्य मल्टिपर्पज कॉ. ऑपरेटीव सोसायटीच्या उसगांव शाखेतर्फे शिक्षक कृतज्ञता सप्ताहानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. उसगांव शाखा कार्यालयात नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात निवृत्त शिक्षक श्रीपाद जांभळे, अंकुश प्रभू, नंदिनी अनंत शिलकर, जयश्री जयराम देसाई, श्वेता गणेश नाईक यांच्यासह शिक्षिका मारिया डिमेलो, सुप्रिया शेळवणकर, दिपा संदीप बिडीकर यांचा सन्मान करण्यात आला.

सिताराम काळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शिक्षक हा समाजाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक असून कोरोना काळात त्यांनी दिलेल्या सेवेचा उल्लेख केला. उपस्थित शिक्षकांनी लोकमान्यच्या तिस्क उसगांव शाखेतील कर्मचाऱयांच्या तत्पर सेवेचे कौतुक केले. लोकमान्यच्या उत्तर गोव्यातील व्यवहार प्रतिनिधी प्रणाली काणेकर यांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करताना तो समाजाच्या उत्कर्षाचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. लोकमान्यतर्फे बँकिंग व्यवहाराबरोबरच विविध प्रकारच्या विमा योजना, पॅनकार्ड, पारपत्र या सेवाही पुरवित असल्याचे सांगितले. सोनाली देसाई यांनी विविध योजनांची माहिती दिली. पूजा धारवटकर, मनोज गांवकर हे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. स्निती बांदेकर यांनी स्वागत तर शाखा व्यवस्थापक संदेश गांवकर यांनी आभार मानले.

Related Stories

रशियातील चार्टर विमान अखेर सर्व पर्यटकांसह दाबोळीत दाखल

Amit Kulkarni

लोकप्रतिनिधींनी फलकांचे शुल्क भरून आदर्श ठेवावा ः शॅडो कौन्सिल

Patil_p

‘फिफा’च्या होर्डिंग्जवरून साग संचालकावर ‘किक’!

Patil_p

भाजपा महिला मोर्चाकडून सरकारचे अभिनंदन

Patil_p

ज्येष्ठ समाजसेवक तथा विविध संस्थांनचे पदाधिकारी गंगाराम मोरजकर यांचे निधन

Amit Kulkarni

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विहिंपचा श्रीरामनाम जप

Amit Kulkarni