Tarun Bharat

लोकमान्य ‘उन्नती’ कार्यक्रमाचे आज उद्घाटन

 प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सोसायटी आयोजित ‘उन्नती 2020 एक पाऊल प्रगतीकडे’ या माfहलांसाठीच्या तिळगुळ समारंभाचे उद्घाटन आज होत आहे. या कार्यक्रमाची उत्सुकता महिलावर्गामध्ये शिगेला पोहचली आहे. बौध्दीक मार्गदर्शनाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमात विजेत्यांना दिल्या जाणार्‍या बक्षिसांची उत्सुकताहि तितकीच आहे. महिलांच्या अपेक्षेला उतरणाराच हा कार्यक्रम ठरणार आहे. हजारो महिलांना उद्योजकतेकडे वळविलेल्या कांचन परुळेकर यांच्या मार्गदर्शनाने बेळगावमधल्या महिलाही स्वावलंबी झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणातून महिलांना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. शर्मिष्ठा राऊत या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. झगमगाटाच्या दुनियेत राहणे वलयांकीत असले तरी हे क्षेत्रसुध्दा आपल्याकडून अपार मेहनतीची अपेक्षा करते हे सांगणारा त्यांचा प्रवास महिलांना उद्बोधक करणारा ठरेल. उन्नती गृहलक्ष्मीच्या निवडीसाठीच्या स्पर्धा महिलांचे निखळ मनोरंजन करतानाच त्यांना व्यासपीठ निर्माण करुन देणारे आहे. एक मिनीटच्या स्पर्धा असल्या तरी त्यातहि बौध्दीक कस लागणार आहे. अंतिम फेरीतील 10 स्पर्धकांमधून पहिल्या 3 विजेत्यांची निवड करण्यात येणार असली तरी या फेरीतील सर्वच स्पर्धक महिलांना बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय विविध बक्षिसांची लयलुट होणार आहे. कार्यक्रम नियोजीत वेळेतच सुरु होणार आहे. चहापान करुन महिलांना आपले वाण घेऊन वेळेवर आसनस्थ होणे आवश्यक आहे. निराशा टाळण्यासाठी आणि कार्यक्रम सुनियोजीतपणे पार पाडण्यासाठी सर्वानी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन लोकमान्य सोसायटीने केले आहे.

Related Stories

आता जप्त केलेल्या वाहनांची न्यायालयातूनच सुटका

Patil_p

एनएफसीआय हॉटेल मॅनेजमेंटचा विक्रम

Amit Kulkarni

लोककल्प फौंडेशन-केएलईतर्फे दंतचिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

मंगसुळी खंडोबाचे दर्शनही भाविकांसाठी बंद

Amit Kulkarni

गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयात नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

Omkar B

कोणत्याही परिस्थितीत बिबटय़ाला मारू नये!

Omkar B
error: Content is protected !!