Tarun Bharat

लोकमान्य ग्रंथालयातर्फे टिळक पुण्यतिथीचे आचरण

बेळगाव  / प्रतिनिधी

येथील लोकमान्य ग्रंथालयात शनिवारी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आचरण्यात आली. यावेळी उद्योजक व बुलकचे सदस्य मोहन इजारे यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रम लोकमान्य ग्रंथालयात झाला.

यावेळी इजारे यांनी टिळक पंचांग, लाल बाल पाल, गीतारहस्य, स्वदेशी अशा शब्दात टिळकांच्या कार्याचा आढावा घेतला. अशोक याळगी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कै. अविनाश ओगले यांची लोकमान्य चित्रपटातील टिळक ही कविता सादर करण्यात आली. कोरोनामुळे हा कार्यक्रम साधेपणाने झाला. याप्रसंगी निखिल नरगुंदकर, किशोर काकडे, किशोर रेडेकर आदी उपस्थित होते. 

Related Stories

फॅशनव्या प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबतर्फे कुली कामगारांचा सत्कार

Patil_p

शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदलाचे आकलन महत्वाचे

Patil_p

Karnataka Election Results : प्रक्रियानुसारच निर्णय घेतले जातील- मल्लिकार्जून खारगे

Archana Banage

खानापूरजवळ स्वतःच्या जागेत वारकरी भवन बांधणार

Amit Kulkarni

गणितचा पेपर पार पडला सुरळीत

Patil_p
error: Content is protected !!