Tarun Bharat

‘लोकमान्य’ महिला सन्मान-2022 ठेव योजना

लहान मुलींपासून सर्व महिलांना आकर्षक व्याज : ज्येष्ठ नागरिक महिलांना 0.50 टक्के अधिक व्याज ,योजनाधारकांना घरपोच आरोग्य तपासणी

प्रतिनिधी /बेळगाव

नव्या युगात स्त्री ही केवळ गृहिणी नाही, तर ती निर्णय घेणारी कर्तृत्ववान आणि पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. म्हणूनच सहकार क्षेत्रातील अग्रगण्य लोकमान्य सोसायटी नेहमीच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. महिला दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सोसायटीने विशेष ‘महिला सन्मान 2022 ही विशेष ठेव योजना’ 7 मार्चपासून सुरू केली आहे. ही योजना केवळ महिला ठेवीदारांसाठी (लहान मुलींसाठीसुद्धा) उपलब्ध आहे. सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते या योजनेचा आज शुभारंभ होत आहे.

 या योजनेची आकर्षक वैशिष्टय़े म्हणजे ठेवधारकास रु. 3000/- किमतीचे थायरोकेअर डायग्नोस्टिक्सचे रक्त तपासणी कूपन दिले जाईल. यात विविध आवश्यक आरोग्य चाचण्यांचा समावेश आहे. ठेवीदाराला 8.60 टक्के आकर्षक व्याज मिळेल. ठेवीची मुदत 400 दिवस आहे. ज्येष्ट नागरिक, महिला अतिरिक्त 0.50 टक्के व्याजासाठी पात्र आहेत. काही अटी व शर्थींवर ठेवी आणि मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. 10 लाखाहून अधिक एकरकमी ठेव पावतीवरसुद्धा अधिक व्याज दर मिळणार आहे. सदर योजना मर्यादित काळासाठी असून 31 मार्च 2022 पर्यंत कार्यान्वित राहील.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी महिलांचा सन्मान करते. त्यामुळेच लोकमान्य सोसायटीच्या 55 टक्के कर्मचारी या महिला आहेत आणि त्यापैकी अनेक त्यांच्या विभागाचे व शाखांचे नेतृत्व करतात. अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा किंवा टोल फ्री नंबरवर 18002124050 कॉल करावा. 213  शाखांचे विस्तार असणारी लोकमान्य सोसायटी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्लीमध्ये ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी उपलब्ध आहे.

Related Stories

जेनीटो कार्दोजला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Patil_p

पाण्याची बचत भविष्यासाठी महत्त्वाची

Omkar B

सॅरिनियोची एफसी गोवाला सोडचिठ्ठी तर अमरजीत ईस्ट बंगालला

Amit Kulkarni

शहर परिसरात गुरुपौर्णिमा उत्साहात

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांचा धोकादायक बसप्रवास सुरूच

Amit Kulkarni

जिल्हय़ात 91 जि.पं.तर 299 ता.पं. मतदारसंघ

Omkar B